India vs Australia | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू म्हणतो, अश्विनसोबत माझी तुलना नको

अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 370 विकेट्स आहेत.

India vs Australia | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू म्हणतो, अश्विनसोबत माझी तुलना नको
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 5:31 PM

मेलबर्न : सध्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवींच्रंदन अश्विनने (R Ashwin) या सामन्यात एकूण 5 विकेट घेतल्या. अश्विन हा जागतिक पातळीचा फिरकीपटू आहे. आश्विन आणि माझी तुलना होणं हे अयोग्य आहे, असं ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon)म्हणाला. (india vs australia r ashwin is a world class spinner my comparison with him is unfair said nathan lyon)

आमची तुलना अशक्य

“अश्विन जागतिक पातळीचा फिरकीपटू आहे. मी अश्विनला अनेकदा गोलंदाजी करताना पाहिलंय. विशेषत: भारत दौऱ्यावर असताना अश्विनची गोलंदाजी जवळून पाहिली आहे. मी अश्विनकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विनची गोलंदाजी ही वैविध्यपूर्ण आहे”, असं लायन दुसऱ्या सामन्याआधी म्हणाला.

“अश्विन आपल्या गोलंदाजीमध्ये अतिशय वेगाने बदल करतो. तसेच तो फार प्रतिभावान आहे. आम्ही दोघे एक सारखेच आहोत, आणि वेगवेगळेही. मात्र आमची तुलना अशक्य आहे. अश्विन काय दर्ज्याचा गोलंदाज आहे, हे त्याच्या आकडेवारीवरुन दिसतं’, असंही लायन म्हणाला.

विकेट्सच्या बाबतीत अश्विनपेक्षा लायनच्या नावावर अधिक विकेट्सची नोंद आहे. लायनने 97 कसोटी सामन्यात 391 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 18 वेळा 5 तर 3 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 50 धावा देऊन 8 विकेट्स ही लायनची एका डावातील सर्वोच्च कामगिरी आहे.

लायनच्या तुलनेत अश्विनच्या कसोटी विकेट्स कमी आहेत. मात्र आश्विनने केवळ 72 सामन्यात 370 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अश्विनने 27 वेळा 5 तर 7 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी फिरकीपटू आहे.

लवकरच 400 विकेट्स

नॅथन लायन आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत महत्वाच्या टप्प्यावर आहे. लायनला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार लायनच्या नावावर कसोटीत एकूण 391 विकेट्स आहेत. यामुळे 400 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी लायनला केवळ 9 विकेट्सची आवश्यकता आहे.

400 वा बळी म्हणून तुला टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूची शिकार करण्याची इच्छा आहे, असं विचारणात आलं. यावर लायन म्हणाला की, “कोणत्याही फलंदाजीची विकेट मिळो. मग तो मयंक अग्रवाल असो की जसप्रीत बुमराह. माझ्यासाठी 400 विकेट्स घेणं महत्वाचं आहे.”

लायन हा कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आणि दुसरा फिरकीपटू आहे. फिरकीपटू शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. वॉर्नच्या नावावर 708 विकेट्स आहेत. तर वेगवान गोलंदाज ग्लेम मॅक्रेगाने एकूण 563 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर लायनचा तिसरा क्रमांक लागतो.

संबंधित बातम्या : 

Aus vs Ind | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर-सीन एबॉर्ट बॉक्सिंग डे कसोटीतून बाहेर

India vs Australia | तब्बल 14 दिवसांनी हिटमॅन रोहित शर्मा बंद खोलीबाहेर, टीम इंडियासोबत मैदानात उतरणार

(india vs australia r ashwin is a world class spinner my comparison with him is unfair said nathan lyon)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.