Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडणार असून दोन्ही संघ सराव करण्यात व्यस्त आहेत. (India and New Zealand will play WTC FInal)

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु
Shubhman Gill Practising

मुंबई : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताचा संघ (Indian Cricket Team) कसून सराव करत आहे. खेळाडूंच्या सरावाचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला ‘दिवसेंदिवस आणखी कणखर’ (Getting stronger each day) असे कॅप्शन ही दिले आहे. (Indian Cricket Team practising for WTC Final BCCI Posted a Video on Twitter)

 

संपूर्ण संघ विलगीकरणात

कोरोनाच्या संकटामुळे भारतीय संघाला सध्या विलगीकरणात राहावे लागत आहे. भारतीय खेळाडूंना आधी भारतातील त्यानंतर इंग्लंडमधील बायो-बबलचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार असून तोवर सर्व खेळाडू विलगीकरणात आहेत. इंग्लंडला गेल्यानंतरही संपूर्ण संघाला 10 दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. या दोन्ही बायो-बबलमध्ये खेळाडूंची वारंवार कोरोना चाचणी केली जाणार आहे.

फिटनेस टेस्ट अनिवार्य

अलीकडे क्रिकेटमध्ये फिटनेसवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात असल्याचे दिसून येते. कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) तर जगभरातील फिटेस्ट खेळाडूंमध्ये गणले जाते. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी उत्तम खेळासोबत सर्व फिटनेस टेस्टमध्ये पास होणेही अनिवार्य झाले आहे.

अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील कामगिरी

भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर 4 सामन्यांत  पराभव पत्करावा लागला असून एक सामना अनिर्णीत राहिला. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

भारताची तगडी फलंदाजी

भारतीय संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासारखे अनुभवी फलंदाजासह शुभमन गिल (Shubhman Gill) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यासारखे स्फोटक युवा फलंदाज आहेत. तसेच हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आश्विनसारखे (Ashwin)  फलंदाज असल्याने भारतीय संघाला 400 धावांचा आकडा पार करणे तसे फारसे अवघड नाही. केवळ खेळपट्टीचा अंदाज घेऊन संयमी खेळी केल्यास भारत सहज लक्ष्य गाठू शकतो.

संबंधित बातम्या 

‘कहीं पर निगाहें, कहीं पर निशाणा’, म्हणे आमचा इंग्लंड दौऱ्यावर फोकस पण किवींना प्रत्यक्षात काळजी भारताची!

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

 

(Indian Cricket Team practising for WTC Final BCCI Posted a Video on Twitter)