IPL 2021 : ‘फक्त काही सामन्यांचा प्रश्न, दमदार पुनरागमन करणार’; मुंबईच्या बॅटिंगवर ‘सूर्या’ला विश्वास

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या यादीत मोठ-मोठी नावे आहेत. रोहित, डिकॉक, इशान किशन, सूर्या, पांड्या ब्रदर्स, कायरन पोलार्ड असे एकाहून एक सरस फलंदाज मुंबईच्या संघात आहे. परंतु मुंबईचे फलंदाज मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना दिसून येत नाहीत. मुंबईची मिडल ऑर्डर तर पार फ्लॉप झाली आहे. IPL 2021 Mumbai indians

IPL 2021 : 'फक्त काही सामन्यांचा प्रश्न, दमदार पुनरागमन करणार'; मुंबईच्या बॅटिंगवर 'सूर्या'ला विश्वास
सुर्यकुमार यादव

मुंबई :  मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबईची बॅटिंग नक्की पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आतापर्यंतच्या 5 सामन्यांत मुंबईचा बॅटिंगला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. किंबहुना मुंबईकडे 7 तगडे बॅट्समन असताना देखील मुंबईला आणखी 160 धावा देखील पार करता आल्या नाहीत. मात्र याच सगळ्यावर बोलताना, ‘केवळ काही सामन्यांची मुंबईची ही समस्या आहे. मुंबईचे बॅट्समन लवकरच धुमधडाक्यात पुनरागमन करतील’, असा विश्वास सूर्यकुमारने व्यक्त केला आहे. (IPL 2021 Mumbai indians vs Punjab kings Suryakumar yadav on mumbai Middle Order batting)

मुंबईची फ्लॉप मिडल ऑर्डर

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या यादीत मोठ-मोठी नावे आहेत. रोहित, डिकॉक, इशान किशन, सूर्या, पांड्या ब्रदर्स, कायरन पोलार्ड असे एकाहून एक सरस फलंदाज मुंबईच्या संघात आहे. परंतु मुंबईचे फलंदाज मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना दिसून येत नाहीत. मुंबईची मिडल ऑर्डर तर पार फ्लॉप झाली आहे.

हा फक्त एका सामन्याचा प्रश्न…

मुंबईची बॅटिंग सध्या संकटात आहे परंतु असं असलं तरीही सूर्यकुमारला अजिबातच चिंता नाहीय. हा केवळ एका सामन्याचा प्रश्न आहे. लवकरच मुंबईची टीम दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

मुंबई दमदार पुनरागमन करणार

प्रत्येक खेळाडू संघ जिंकावा म्हणून आटोकाट प्रयत्न करत आहे. तसंच संघाच्या विजयासाठी प्रत्येकजण जबाबदारी घेतो आहे परंतु खेळाडूंच्या प्रयत्नाला यश येत नाही एवढंच… पण मुंबईचे सगळे खेळाडू दमदार कामगिरी करतील असा मला विश्वास आहे, असं सूर्यकुमार म्हणाला.

पंजाबकडून मुंबईचा 9 विकेट्सने पराभव

रोहित शर्माने पंजाबविरुद्ध 63 रन्सची झुंजार खेळी केली. परंतु त्याला मिडल ऑर्डर्सची साथ लाभली नाही. 131 धावांचं माफक लक्ष्य दिलेल्या पंजाबने हे आव्हान यशस्वीपणे पार केलं.

(IPL 2021 Mumbai indians vs Punjab kings Suryakumar yadav on mumbai Middle Order batting)

हे ही वाचा :

शोएब अख्तरने मागितली अल्लाहकडे दुवा, म्हणतो, ‘काळ कठीण, भारतीयांना शक्ती दे’

KKR vs RR, IPL 2021 Live Streaming : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : Point Table मध्ये पहिल्या नंबरवर कोण तर तळाला कोण?, ऑरेंज कॅफ, पर्पल कॅप कुणाकडे?