IPL 2021 RCB vs KKR Live Streaming : रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सामना कुठे, कधी, केव्हा?

पाठीमागील दोन्ही सामने जिंकल्याने विराट सेनेचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. तर इकडे कोलकाता आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहे. (IPL 2021 Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders live Streaming When And Where To Watch online Free in Marathi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:16 PM, 18 Apr 2021
IPL 2021 RCB vs KKR Live Streaming : रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सामना कुठे, कधी, केव्हा?
RCB vs KKR Live Streming

चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दहावा सामना आज तुफान फॉर्मात असणाऱ्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders) यांच्यात होत आहे. बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला शेवटच्या चेंडूवर नमवलं तर दुसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभवाचं तोंड पाहायला लावलं. दुसरीकडे कोलकात्याने दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवलाय तर एका सामन्यात कोलकात्याला पराभव स्वीकारावा लागला. आज हे दोन्ही संघ चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर एकमेकांविरोधात उतरतील. (IPL 2021 Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders live Streaming When And Where To Watch online Free in Marathi)

आजच्या सामन्यात हॅट्रिकच्या इराद्याने विराट सेना मैदानात उतरेल. पाठीमागील दोन्ही सामने जिंकल्याने विराट सेनेचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. तर इकडे कोलकाता आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहे. आंद्रे रसेलची बॅट शांत आहे, जी बोलणं कोलकात्यासाठी गरजेची आहे.

सामना कधी आणि कुठे…?

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 10 वा सामना आज 18 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 3.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 3 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders live Streaming When And Where To Watch online Free in Marathi)

हे ही वाचा :

MI vs SRH IPL 2021 : जिंकल्यानंतरही रोहितच्या मनात या दोन बोलर्सची धास्ती, म्हणतो ‘खेळणं एवढंही सोपं नव्हतं!’

पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार, पाहा पोलार्डच्या बॅटमधल्या ‘जादू’चा Video  

IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची नवी मिस्ट्री गर्ल!