IPL Auction 2021 | ऑक्शनच्या एकदिवसाआधी ‘या’ स्टार खेळाडूची माघार

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी आज चेन्नईत लिलाव प्रक्रिया (ipl auction 2021) पार पडणार आहे.

IPL Auction 2021 | ऑक्शनच्या एकदिवसाआधी 'या' स्टार खेळाडूची माघार
मार्क वुडने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या लिलावातून माघार घेतली आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:42 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी आज (18 फेब्रुवारी) चेन्नईत (Chennai) खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे. या लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी 61 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. आपल्या संघात तगडे खेळाडू घेण्याचा मानस प्रत्येक फ्रँचायजीचा असणार आहे. हा लिलावाचा कार्यक्रम चेन्नईत पार पडणार आहे. दरम्यान या लिलावाच्या एक दिवसाआधी इंग्लंडचा कर्णधार जो रुटनंतर (Joe Root) आणखी एका खेळाडूने या लिलावातून माघार घेतली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने (England Mark Wood) लिलावातून आपलं नाव मागे घेतलं आहे. वुडने आपण माघार घेत असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलला बुधवारी दुपारी दिली. (ipl auction 2021 mark wood withdraws his name due to personal reason)

माघार घेण्याचं कारण काय?

आयपीएलमध्ये अनेक खेळाडू माघार घेतात. अनेक खेळाडूंच या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न असतं. हजारो खेळाडू यासाठी नोंदणी करतात. पण अशा अवघड प्रक्रियेनंतर लिलाव तोंडावर असताना वुडने असा तडकाफडकी निर्णय का घेतला, असा प्रश्न वुडच्या चाहत्यांना पडला आहे. पण वुडने माघार घेण्यामागे कारणही तसंच आहे. वुडने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. वुड बाबा झाला आहे. त्याच्या घरी काही दिवसांपूर्वी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. अशा प्रसंगी वुडला आपल्या पत्नीसोबत वेळ व्यतित करायचा आहे. यामुळे वुडने माघार घेतली आहे.

वुडने आतापर्यंत 18 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 11 टी 20 सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर आयपीएलमध्ये वुडने चेन्नईकडून एकमेव सामना खेळला आहे.

वुडची बेस प्राईज 2 कोटी

वुडची या लिलावासाठी बेस प्राईज (किमान किंमत) ही 2 कोटी होती. म्हणजेच जर वुड लिलावात सहभागी झाला असता, तर त्याला किमान 2 कोटी तर जास्तीत त्यापेक्षा अधिक किंमत मिळाली असती. वुड आयपीएलच्या ऑक्शन लिस्टमध्ये 24 व्या क्रमांकावर होता. दरम्यान आता वुडने माघार घेतल्याने आता इंग्लंडकडून आयपीएलच्या लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या ही 16 झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनेही याआधीच लिलावातून माघार घेतली आहे.

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ECBकडून सवलत

इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम या एप्रिल-मेमध्ये खेळला जाणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलसाठी आपल्या खेळाडूंना सवलत दिली आहे. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू न्यूझीलंड दौर्‍याबाहेर राहू शकतात, असं बोर्डाचे म्हणणं आहे. इंग्लंड जूनमध्ये न्यूझीलंडबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि यावेळी आयपीएल बाद फेरीतील सामनेदेखील नियोजित होणं अपेक्षित आहे.

इंग्लंडचे कोच ख्रिस सिल्वरवुड म्हणाले की, “खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू नये, असं सांगणं कठीण होतं. बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली हे खेळाडू सर्व फॉर्मेटमध्ये खेळतात. या खेळाडूंना रोटेशन नियमांनुसार भारत आणि श्रीलंका दौर्‍यात समावेश करण्याचा निर्णय घेतला”.

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

नागालँडचा एकलव्य, शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहून फिरकी शिकला, आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज

(ipl auction 2021 mark wood withdraws his name due to personal reason)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.