Ireland vs India T20i Series | आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका विजय, कॅप्टन जसप्रीत बुमराह याचा मोठा रेकॉर्ड

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघाने आयर्लंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका ही 2-0 ने जिंकली आहे.

Ireland vs India T20i Series | आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका विजय, कॅप्टन जसप्रीत बुमराह याचा मोठा रेकॉर्ड
| Updated on: Aug 24, 2023 | 12:07 AM

डब्लिन | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची 3 सामन्यांची टी 20 मालिका ही 2-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले 2 सामने हे सलग जिंकले. तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून आयर्लंडला क्लिन स्वीप देण्याचा प्रयत्न होता. मात्र पावसामुळे तिसरा सामना हा रद्द करण्यात आला. पावसाने टीम इंडियाची आयर्लंडचा सुपडा साफ करण्याची संधी हिसकावली. मात्र बुमराहने विक्रम केला.

टीम इंडियाने मालिका जिंकली

नक्की रेकॉर्ड काय?

जसप्रीत बुमराह याने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिकेतील हॅटट्रिक पूर्ण करुन दिली. टीम इंडियाने सर्वातआधी विराट कोहली याच्या नेतृत्वात 2018 मध्ये आयर्लंड विरुद्ध 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली. त्यानंतर गेल्या वर्षी टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2-0 अशीच सीरिज खिशात घातली. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही मालिका या 2 सामन्यांच्याच होत्या.

आता टीम इंडिया 2023 मध्ये जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात आयर्लंडला गेली. टीम इंडियाने पहिला सामना हा डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह मालिकाही जिंकली. बुमराहला आता तिसरा सामना जिंकून 3-0 अशी मालिका जिंकण्याची संधी होती. पण पावसामुळे खेळखंडोबा झाला.  पण बुमराहने आयर्लंड विरुद्ध  मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली.

टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.