Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहचं नाव…

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा तोंडावर असताना टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात या स्पर्धेपूर्वी तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या संघात बदल करण्यात आला आहे. मात्र जसप्रीत बुमराहचं नाव नसल्याने चिंता वाढली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहचं नाव...
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 6:44 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून होत आहे. मालिका सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच संघात बदल करण्यात आला आहे. वरुण चक्रवर्तीची या संघात निवड करण्यात आली आहे. टी20 मालिकेत त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली आहे. पण बदल केलेल्या संघात जसप्रीत बुमराहचं नाव कुठेच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याची निवड केली नव्हती. तिसऱ्या वनडे सामन्यात खेळेल असं सांगण्यात येत होतं. पण त्या आशाही मावळल्या आहेत. कारण नव्या संघात जसप्रीत बुमराहचं नाव नाही. टीम इंडियात जसप्रीत बुमराहचं नाव सब्जेक्ट टू फिटनेस म्हणूनही लिहिलेलं नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

टीम इंडियाच्या निवड समितीतीचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी यापूर्वी टीम इंडिया घोषित करताना बुमराहबाबत मोठी अपडेट दिली होती. अजित आगरकर म्हणाले होते की, ‘बुमराहला पाच आठवडे विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात तो खेळणार नाही.’ अजित आगरकर यांनी तेव्ह दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात खेळेल असं वाटत होतं. पण आता जाहीर करण्यात आलेल्या टीममध्ये जसप्रीत बुमराहचं कुठेच नाव नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह वनडे मालिकेला मुकला आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ गोलंदाजीत कमकुवत आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीही आताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे त्यालाही अजून तसा सूर गवसलेला नाही. जसप्रीत बुमराह बऱ्याच कालावधीपासून पाठदुखीमुळे त्रस्त आहे. यावेळीही त्याला पाठीची दुखापत असून चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळेल की नाही याबाबत शंका आहे. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे आता खूपच कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेचं वातावरण आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.