IND vs AUS : वनडे सीरिजसाठी टीममध्ये 2 खेळाडूंची अचानक एन्ट्री, पहिल्या सामन्यासाठी संधी, कोण आहेत ते?
India vs Australia 1st Odi : शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया एकदिवसीय मालिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या सामन्यातून 2 खेळाडू बाहेर पडले आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळणार आहे. तर त्यानंतर 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक करणार आहेत. टीम इंडिया या दौऱ्यासाठी 15 ऑक्टोबरला रवाना होणार आहे. त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंना बाहेर व्हावं लागलं आहे. ते दोघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया दोघे आऊट, दोघांना संधी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सलामीचा सामना हा 19 ऑक्टोबरला पर्थ येथे होणार आहे. त्याआधी लेग स्पिनर एडम झॅम्पा आणि विकेटकीपर जोश इंग्लिस या दोघांना एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. या दोघांच्या जागी मॅथ्यू कुहनेमॅन आणि जोश फिलीप या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
झॅम्पा याने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. झॅम्पा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे झॅम्पाला पर्थ इथून न्यू साऊथ वेल्सला परतणं शक्य होणार नाही. त्यामुळे झॅम्पाने कुटुंबियांसह राहण्याचा निर्णय घेतला आहे. झॅम्पा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तर जोश इंग्लिस अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे या दोघांना सलामीच्या सामन्याला मुकावं लागणार आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
मॅथ्यू कुहनेमॅनचं 3 वर्षांनंतर कमबॅक
मॅथ्यू कुहनेमॅनला संधी मिळाल्याने त्याचं एकदिवसीय संघात या निमित्ताने 3 वर्षांनंतर कमबॅक होणार आहे. तसेच मॅथ्यूचा हा मायदेशातील पहिला एकदिवसीय सामना असणार आहे. मॅथ्यूने याआधी श्रीलंकेविरुद्ध 2022 साली 4 एकदिवसीय सामने खेळले होते.
इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा सामना, 25 ऑक्टोबर, सिडनी
ऑस्ट्रेलियाचे 2 खेळाडू पहिल्या सामन्यातून आऊट
Two crucial white-ball players will miss Australia’s opening ODI against India
Read more 👇https://t.co/BBTly4qa4d
— ICC (@ICC) October 14, 2025
एलेक्स कॅरी दुसऱ्या सामन्यातून परतणार
दरम्यान एलेक्स कॅरी दुसर्या सामन्यातून एकदिवसीय संघासह जोडला जाणार आहे. तसेच ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन पहिल्या 2 सामन्यांसाठी सज्ज आहे. मात्र कॅमेरुनला तिसऱ्या अर्थात अंतिम सामन्याला मुकावं लागणार आहे.
