तोच दिवस, जेव्हा पोलार्डने 10 चेंडूत 46 धावा ठोकल्या, मुंबईच्या पहिल्या विजयाची कहाणी

पोलार्डच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर 2013 साली मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले होते. (Mumbai indians Won their First Title With Pollards Help)

तोच दिवस, जेव्हा पोलार्डने 10 चेंडूत 46 धावा ठोकल्या, मुंबईच्या पहिल्या विजयाची कहाणी
पोलार्ड

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा हुकुमी एक्का म्हणजे वेस्‍ट इंडीज संघाचा (West Indies Cricket team) अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघाचा सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून पोलार्डची ख्याती आहे. याच ख्यातीला साजेशी खेळी पोलार्डने 2013 च्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग (Chennai Superkings) यांच्यातील अंतिम सामन्यात केली होती. पोलार्डने अवघ्या 32 चेंडूत 60 धावा ठोकत मुंबईला एक चांगली धावसंख्या करुन दिली होती. ज्यातील 46 धावातर त्याने अवघ्या 10 चेंडूत केल्या होत्या. पोलार्डच्या याच खेळीच्या जोरावर मुंबईने आपला पहिला आयपीएलचा किताब पटकावला होता. (Kieron Pollard 32 ball 60 runs helped Mumbai Indians to Grab their first ipl title)

असा झाला होता सामना

आजपासून ८ वर्षांपूर्वी म्हणजे 26 मे, 2013 रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग यांच्यात आयपीएल 2013 चा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे पहिल्या फळीतील फलंदाज अत्यंत कमी धावा करुन बाद झाले. त्यावेळी रायडूच्या मदतीने पोलार्डने एकाकी झुंज देत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे मुंबई चेन्नईसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवू शकली. ज्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ केवळ 125 धावांच करु शकला. ज्यामुळे मुंबईचा संघ 23 धावांनी विजयी झाला.

धोनीने दिली होती कडवी झुंज

सामन्यात मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज एक-एक करुन बाद होते. सुरेश रैना (Suresh Raina), बद्रीनाथ (Badrinath), रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) तर शून्य धावांवर बाद झाले होते. अशावेळी कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मात्र टिकून राहिला. महत्त्वाच्या सामन्यात धोनीने 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. मात्र अखेर चेंडू कमी पडल्याने धोनी विजयश्री खेचून आणू शकला नाही.

पोलार्डची अष्टपैलू कामगिरी

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार कायरन पोलार्डने आतापर्यंत आयपीएलमध्ये 171 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 150.87 च्या स्‍ट्राइक रेटने 16 अर्धशतक ठोकत 3 हजार 191 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे पोलार्डने गोलंदाजीतही चमक दाखवत 63 बळी ही पटकावले आहेत.

VIDEO : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज 2013 फायनलचा थरार

संबंधित बातम्या 

‘तो’ पराभव जिव्हारी, आंद्रे रसेलचा आयपीएलमधील शॉवर किस्सा!

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

(Kieron Pollard 32 ball 60 runs helped Mumbai Indians to Grab their first ipl title)