तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

विराट कोहलीने 482 सामन्यांत 55.78 च्या सरासरीने 22818 धावा करत 70 शतकं ठोकली आहेत.

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!
virat and sachin

नवी दिल्ली : ‘किंग कोहली’ या नावाने प्रसिद्ध असणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) सध्या जगातील अव्वल फलंदाज म्हणून पाहिले जाते. विराट कोहली वाऱ्याच्या वेगाने एक-एक रेकॉर्ड तोडत असून क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा (Sachin Tendulkar) तो केवळ 30 शतकं मागे असून, अशाच वेगात शतकं ठोकत राहिला तर निवृत्तीपूर्वी सचिनपेक्षा 30 शतकं अधिक ठोकू शकतो, असं सध्याच्या सरासरीवरुन समोर आलं आहे. (King Virat Kohli To break Sachin Tendulkar record of most ODI Hundreds)

कोहली सद्यस्थितीला तेंडुलकरपेक्षा 207 एकदिवसीय सामने कमी खेळला असला तरी तो केवळ 6 शतकंच मागे आहे. विराटने 245 एकदिवसीय सामन्यांत 43 शतकं केली आहेत. तर सचिनने संपूर्ण कारकिर्दीत 452 एकदिवसीय सामन्यांत 49 शतकं केली होती. त्यामुळे जर विराट सचिन इतके सामने खेळला आणि सद्याच्या सरासरीने शतकं करत राहिला, तर निवृत्तीपूर्वी तो 79 शतकं ठोकू शकतो, जी सचिनपेक्षा 30 ने अधिक असतील.

कोहलीची शतकांची सरासरी तेंडुलकरपेक्षा जास्त

विराट कोहली आतापर्यंत वन डे, टी ट्वेण्टी आणि कसोटी अशा सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 482 सामने खेळला आहे. जेव्हा सचिन 482 सामने खेळला होता, त्यावेळी त्याची आकडेवारी किती होती आणि कोहलीची किती आहे, त्याची तुलना केल्यास कोहली खूप पुढे असल्याचं दिसतं.  वन डे, टी ट्वेण्टी आणि कसोटी अशा सर्व फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय 482 सामन्यात, सचिनने 49.03 च्या सरासरीने 21 हजार 331 धावा करत 66 शतकं ठोकली होती.

मात्र कोहलीने तितक्याच सामन्यांत, तिन्ही फॉरमॅटमध्ये 55.78 च्या सरासरीने 22 हजार 818 धावा करत 70 शतकं ठोकली आहेत. म्हणजेच कोहलीची सरासरी ही सचिनपेक्षा खूप जास्त आहे.

एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्यात मात्र तेंडुलकरच पुढे असून 1998 मध्ये तेंडुलकरने 12 शतकं केली होती, तर कोहलीने 2017 आणि 2018 मध्ये प्रत्येकी 11 शतकं केली आहेत.

शतकी-अर्धशतकी खेळी करण्यात कोहली ‘चॅम्पियन’

आंतरराष्ट्रीय सामन्यांत शतक किंवा अर्धशतक ठोकण्याचा विराट कोहलीची सरासरी उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 115 अर्धशतकं तर 70 शतकं केली आहेत. याचा अर्थ कोहली दर 2.64 सामन्यांनतर शतक किंवा अर्धशतक ठोकतो. या सरासरीने कोहली चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोहलीपेक्षा केवळ 0.4 च्या फरकाने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा नंबर लागतो. तर तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे.

कोहलीचा वेग मंदावला

विराट कोहलीने आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी करत सर्व फॉरमॅटमधील एकूण 482 सामन्यांत 70 शतकं ठोकली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान कामगिरी असली तरी नोव्हेंबर 2019 पासून मात्र कोहली एकही आतंरराष्ट्रीय शतक ठोकू शकला नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये ईडन गार्डन्समध्ये बांग्लादेशविरोधात 136 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याने एकही शतक झळकावलं नाही.

संबंधित बातम्या 

सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार? 

(King Virat Kohli To break Sachin Tendulkar record of most ODI Hundreds)