IPL 2021: केकेआर संघाला मोठा झटका, ‘हा’ महत्त्वाचा परदेशी खेळाडू उर्वरीत सामन्यांना मुकणार

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली उर्वरीत IPL 2021 सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान युएईत आयोजित केली जाणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने शनिवारी दिली.

IPL 2021: केकेआर संघाला मोठा झटका, 'हा' महत्त्वाचा परदेशी खेळाडू उर्वरीत सामन्यांना मुकणार
केकेआर

सिडनी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी झालेल्या विशेष सभेत उर्वरीत आयपीएलचे सामने (IPL 2021) सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान सामन्यांचे ठिकाण आणि वेळ बदलल्याने बऱ्याच परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज पॅट कमिन्सही (Pat Cummins) उर्वरीत सामन्यांसाठी युएईला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांनी हा दावा केला आहे. (KKR Fast Bowler Pat cummins Wont Play in remaing Ipl 2021 says Australian Media Report)

9 एप्रिल रोजी सुरु झालेल्या आयपीएलमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा (Amir Mishra) आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा (Wridhiman saha) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा चर्चा केल्यानंतर उर्वरीत आय़पीएल होणार फक्त ठिकाण भारताऐवजी युएई असणार असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे.

कर्णधारपदाची ही वानवा

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) देखील विश्वचषकाच्या तयारीचे कारण देत आयपीएलमध्ये खेळाडूंना खेळू देणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होत. बोर्डाचे व्यवस्थापक एश्ले जाइल्स (Ashley Giles) यांनी ही माहिती दिली होती. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgen) इंग्लंडचा असल्याने केकेआरला नवा कर्णधार नेमावा लागणार आहे. दिनेश कार्तिकसह (Dinesh Karthik) पॅट कमिन्सचही नाव कर्णधारपदासाठी सूचवलं जात असताना या नव्या माहितीमुळे केकेआरवर आणखीच बिकट परिस्थिती आली आहे.

IPL 2021 चे आयोजन

आयपीएल 2021 मध्ये सुरुवातीचे 29 सामने खेळवण्यात आले होते. त्यानंतर सध्या 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. बीसीसीआयने शनिवारच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा केली. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार युएईत घेणार असल्याचं बीसीसीआयने सांगितले.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर बीसीसीआय सध्या काम करत आहे. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे सांगितल्याने इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, याबद्दलही बीसीसीआय माहिती घेत आहे

संबंधित बातम्या 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(KKR Fast Bowler Pat cummins Wont Play in remaing Ipl 2021 says Australian Media Report)