
मॅक्स 60 कॅरेबियन लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरेबियन टायगर्सने न्यूयॉर्क स्ट्राईकर्सला 56 धावांनी पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. कॅरेबियन टायगर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅरेबियन टायगर्सने 20 षटकात 6 गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं. पण न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा संपूर्ण संघ 69 धावांवर बाद झाला. या सामन्यात न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळणारा आणि टी20 वर्ल्डकपचा हिरो असलेल्या कार्लोस ब्रॅथवेटला राग अनावर झाला. लीगमध्ये वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्याने कार्लोस ब्रॅथवेट चांगलाच संतापला. तंबूत परताना त्याने हेल्मेट हवेत उडवलं आणि पूर्ण ताकदीने बॅटने मारलं. त्यासाठी त्याने लावलेली ताकद इतकी होती की, हेल्मेट थेट मैदानाबाहेर गेलं. ब्रँथवेटला नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आऊट दिलं.
न्यूयॉर्क स्ट्राईकर्सची 24 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना कार्लोस ब्रॅथवेट मैदानात उतरला. त्याच्याकडून संघाला बऱ्याच अपेक्षा होत्या. अँड्र्यू ट्रायने त्याला शॉर्ट पिच बॉल टाकला आणि त्याच्या खांद्याला लागून थेट विकेटकीपरच्या हातात गेला. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. पंचांना वाटलं की ब्रॅथवेटच्या ग्लव्ह्सला चेंडू लागून थेट विकेटकीपरच्या हाती गेला. त्यामुळे त्यांनी त्याला बाद घोषित केलं. डगआऊटपर्यंत जाता जाता ब्रॅथवेट आपला राग नियंत्रित करू शकला नाही. हेल्मेल वर उडवलं आणि बॅट जोरात मारली. यामुळे डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफची पळापळ झाली. दुसरीकडे, विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा संपूर्ण संघ कोलमडला. तळाच्या फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दोन फलंदाज शून्यावर बाद झाले.
Carlos Brathwaite smashed the Helmet with Frustration.
pic.twitter.com/Cb4xUTPNzI— CricketGully (@thecricketgully) August 25, 2024
न्यूयॉर्क स्ट्रायकर्स : केन्नर लेव्हिस (विकेटकीपर), कोलिन मुन्रो, चंद्रपॉल हेमराज, थिसारा परेरा (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, मिचेल ओवन, इसुरु उडाना, अखिलेश बोडुगम, केन्डेल फ्लेमिंग, मतिउल्लाह खान,डेविऑन कॉडनर, अंश पटेल.
कॅरेबियन टायगर्स : जॉर्ज मुन्से (विकेटकीपर/कर्णधार), कोबे हेर्फ्ट, कॅमरोन हेम्प, ब्रॅडले कुरी, मायकल लीस्क, एशले नर्स, सचा डी अल्विस, निक होबसन, अँड्रयु टाय, पॅडी डूले, रोमियो डुंका, ख्रिस लीन