Video : मोहम्मद कैफ पत्नीसोबत घरीच खेळतोय क्रिकेट, पाहा व्हिडिओ

सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच घरी राहण्याचे आव्हान सरकारने केले आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफही घरीच असून त्याने घरातच पत्नीसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे.

Video : मोहम्मद कैफ पत्नीसोबत घरीच खेळतोय क्रिकेट, पाहा व्हिडिओ
मोहम्मद कैफ आणि पत्नी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. क्रिकेट जगताला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याने भारतातील सर्व क्रिकेट स्पर्धांसह इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) ही रद्द झाली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा प्रशिक्षक मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) घरीच असल्याने तो घरच्यांसोबत वेळ घालवताना दिसून येत आहे. कैफ आपल्या पत्नीसह घरातच क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (Mohammad Kaif playing Cricket at home with his Wife)

मोहम्मद कैफ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. त्याचसोबत तो फिनिशर बॅट्समनही होता. बॉलिंगमध्ये मात्र त्याने काही खास कामगिरी केली नव्हती. तरीदेखील घरात मात्र तो पत्नीसाठी बॉलर झाला आहे. व्हिडिओमध्ये मोहम्मद कैफ बॉल टाकत असून त्याची पत्नी प्रत्येक बॉल मारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohammad Kaif (@mohammadkaif87)

फिल्डींग मात्र अव्वल!

संपूर्ण व्हिडिओत कैफने टाकलेले चेंडू त्याची पत्नी उत्तमरित्या खेळताना दिसत आहे. मात्र असे असतानाही तिने मारलेला प्रत्येक चेंडू कैफ अत्यंत सहजपणे पकडताना दिसत आहे. ज्यातून तो आजही एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचं
लक्षात येत आहे.

2011 मध्ये अडकला होता लग्नबेडीत

मोहम्मद कैफच्या पत्नीने नाव पूजा असून ती नोएडामधील पत्रकार आहे. मोहम्मद आणि पूजा यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार दोघेही 2007 मध्ये पहिल्यांदा भेटले
होते. मोहम्मद आणि पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलाच नाव कबीर तर मुलीच नाव ईवा आहे.

 

संबधित बातम्या

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

(Mohammad Kaif playing Cricket at home with his Wife)