WTC Final : न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर न्यूझीलंडच्या संघात

न्यूझीलंडच्या या फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत जास्त संधी मिळत नसल्याने तो न्यूझीलंडच्या संघात सामिल झाला आहे. डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात तो न्यूझीलंड संघाकडून तो महत्त्वाची भूमिका पार पाडेल

WTC Final : न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर न्यूझीलंडच्या संघात
डेवन कॉन्वे

साऊदम्पटन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या साऊदम्पटन येथे पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ आपआपली रणनीती आखत असून न्यूझीलंड संघाला एक उत्कृष्ट सलामीवीर मिळाला आहे. डेवन कॉन्वे असं या खेळाडूंच नाव आहे. 29 वर्षीय डेवनने मागील वर्षी न्यूझीलंड संघाकडून टी-20 सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धमाकेदार कामगिरीमुळे डेवनने अवघ्या 8 महिन्यांत कसोटी संघात सलामीवीराची जागा मिळवली आहे. डेवन इंग्लंड सोबत 2 जूनपासून सुरु होणाऱ्या सराव सामन्यांत ही न्यूझीलंडकडून सलामीसाठी उतरणार आहे. (New Zealand Team got New Opener Batsman Davon Conway Will Play England vs New Zealand Test Match Before WTC Final)

विलियम्सनची वाटते भीती

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेवन कॉन्वे याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. डेवन याला कर्णधार केन विल्यमसनची (Captain Ken Williamson) भिती वाटत असल्याचं त्यानं सांगितलं. आतापर्यंत डेवनने काही सामन्यांत उत्तम प्रदर्शन केलं आहे. मात्र जेव्हा नॉन-स्ट्राईकवर विल्यमसन उभा असतो आणि तुमची बॅटिंग पाहत असतो, तेव्हा भिती वाटते असं त्यानं सांगितलं.

म्हणून दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडला

डेवन कॉन्वे हा मूळचा दक्षिण आफ्रीकेचा (South Africa). तिथेच त्याने क्रिकेट करीयरला सुरुवात केली. मात्र तिथे प्रथम श्रेणी सामन्यांत जास्त संधी मिळत नसल्यानं तो चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडला आला. प्रथम वेलिंग्टन फायरबर्ड्ससाठी खेळल्यानंतर 17 प्रथम श्रेणी सामन्य़ांत चार शतक ठोकल्यानं त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात सहज स्थान मिळालं. टी-20 मधील उत्तम प्रदर्शनामुळे आता कॉन्वे कसोटी क्रिकेटमध्येही सलामीसाठी उतरताना दिसून येतो.

किवींविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(New Zealand Team got New Opener Batsman Davon Conway Will Play England vs New Zealand Test Match Before WTC Final)