WTC Final च्या सामन्यापूर्वी रवींद्र जाडेजाकडून मोठा खुलासा, फोटो शेअर करत दिली माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदम्पटन येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंड संघासोबत भारतीय संघ पाच कसोटी सामने देखील खेळणार आहे

WTC Final च्या सामन्यापूर्वी रवींद्र जाडेजाकडून मोठा खुलासा, फोटो शेअर करत दिली माहिती
रवींद्र जाडेजा

साऊदम्पटन : भारतीय संघ (Indian Team) 18 जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC FInal) अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्व भारतीय खेळाडू विलगीकरणात असून 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. मात्र त्यापूर्वी या सामन्यासंबधी एक मोठा खुलासा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने ( (Ravindra Jadeja) केला आहे. त्याने भारतीय संघ सामन्यात वापरणाऱ्या 90 च्या दशकातील रेट्रो जर्सी स्वेटरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Ravindra Jadeja Revealed Team India New Retro Jersey Sweater For World Test Championship Final)

जाडेजाने त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर रेट्रो जर्सी स्वेटर घातलेला फोटो पोस्ट केला आहे. ज्याला त्याने ‘पुन्हा 90 च्या दशकात #lovingit #india.’ असे कॅप्शन दिले आहे. हे नवीन जर्सी स्वेटर अगदी 90 च्या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू घालायचे तसे आहे. ज्यात मध्यस्थानी INDIA असे लिहिले आहे. तर वरच्या एका बाजूला ICC WTC FINAl 2021 आणि दुसऱ्या बाजूला बीसीसीआयचा लोगो देण्यात आला आहे.

नवीन प्रायोजकाने तयार केली जर्सी

हे रेट्रो जर्सी स्वेटर भारतीय संघाच्या जर्सींसाठी सध्या प्रायोजक असणाऱ्या एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) या कंपनीने तयार केले आहे. नोव्हेंबर, 2020 पासून एमपीएल स्पोर्ट्स ही कंपनी संघासाठी जर्सी स्पॉन्सर करत आहे. याआधी देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी 1992 च्या विश्वचषकातील रेट्रो जर्सी वापरली होती.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल

संबधित बातम्या :

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

(Ravindra Jadeja Revealed Team India New Retro Jersey Sweater For World Test Championship Final)