England Tour India | टीम इंडियाला मोठा झटका, रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेबाहेर

इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरोधात टेस्ट, एकदिवसीय आणी टी 20 मालिका खेळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:52 PM, 21 Jan 2021
England Tour India | टीम इंडियाला मोठा झटका, रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेबाहेर
टीम इंडिया

चेन्नई : टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतामुळे इंग्लडविरोधातील कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळे हा मोठा धक्का बसला आहे. जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत फलंदाजीदरम्यान हाताला दुखापत झाली होती. यामुळे त्याला या मालिकेतील चौथ्या  सामन्यालाही मुकावे लागले होते. (ravindra jadeja ruled out against england test series due to injurey)

जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जाडेजाच्या अंगठ्याला ही दुखापत झाली. जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी 5-6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे त्याला या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.

इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. यातील पहिले 2 सामने हे चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहेत. 19 फेब्रुवारीला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी एकूण 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या 2 सामन्यांसाठी जाडेजाची निवड करण्यात आली नाही.

त्यामुळे जाडेजा उर्वरित 2 सामन्यांपर्यंत दुखापतीतून सावरेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्याला अजून वेळ लागणार आहे. यामुळे टीम इंडियाच्या समर्थकांना इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत जाडेजाची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळणार नाही. दरम्यान जाडेजा आता बंगळुरुतील (NCA) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रवाना होणार आहे. जाडेजा तिथे वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली असणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

संबंधित बातम्या :

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

(ravindra jadeja ruled out against england test series due to injurey)