‘या’ भारतीय खेळाडूमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटत, इंग्लंड क्रिकेटपटूची कबुली

भारताला ऑस्ट्रेलिया विरोधात ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात या युवा खेळाडूता सिंहाचा वाटा होता. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सराव करत आहे.

'या' भारतीय खेळाडूमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटत, इंग्लंड क्रिकेटपटूची कबुली
ऋषभ पंत

मुंबई : जेव्हापासून टी-20 क्रिकेट हा नवा फॉर्मेट आला आहे कसोटी क्रिकेटमधील प्रेक्षकांचा रस कमी होताना दिसत आहे. मात्र नुकतच भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्यांच भूमीत मात देत गावस्कर-बॉर्डर चषक जिंकत इतिहास रचला. त्यानंतर विजयाचा शिल्पकार असणाऱ्या ऋषभ पंतची (Rishabh Pant) सर्वच स्तरातून वाह-वाह होत होती. दरम्यान इंग्लंडचा टी-20 स्पेशलिस्ट टाइमल मिल्‍सने (Tymal Mills)  पंतमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटतं अशी कबुली दिली. (Rishabh pant is Reason I Love Watching Test Cricket says Tymal Mills)

मिल्स म्हणाला, ”मला मूळात कसोटी क्रिकेट जास्त आवडत नाही, पण जेव्हापासून ऋषभ पंतला खेळताना पाहिलं, तेव्हापासून मी त्याच्या बॅटिंगचा फॅन झालोय आणि त्यामुळे मला कसोटी सामनेही आवडू लागले आहेत.”

कोण आहे टाइमल मिल्‍स?

टाइमल मिल्‍स हा 28 वर्षीय इंग्लिश क्रिकेटर (England Cricketer) आहे. मिल्स इंग्लंडच्या टी-20 स्कॉडमधील महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. मिल्स 2016 पासून इंग्लंड संघातून खेळत आहे. मात्र सतत दुखापतग्रस्त असल्याने मिल्स आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. दुखापतींमुळेच चार दिवस चालणारा कसोटी सामना खेळत नाही असंही मिल्सनं सांगितलं.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी पंत तयार

यंदा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 2021 या वर्षांत आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पंतने 10 डावांमध्ये 64.38 च्या सरासरीने 515 धावा ठोकल्या. ज्यात एका शतकासह 4 अर्धशतकांचा समावेश होता. दरम्यान आता पंत यंदाच्या वर्षातील सर्वांत महत्त्वाचा कसोटी सामना असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तो यासाठी जीममध्ये दिवस-रात्र घाम गाळत आहे.

रिषभ पंतचा व्हायरल स्टंट

रिषभ पंत ‘वजन’दार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी वा आयपीएल स्पर्धेअगोदर त्याने वजन कमी केलं असलं तरी आणखीही तो तेवढाच वजनदार खेळाडू दितो. अशा वजनदार खेळाडूंना जीममध्ये जरा जास्त घाम गाळावा लागतो. रिषभने जीममध्ये त्याचा आवडता स्टंट केला जो मैदानावर तो नेहमी करताना दिसून येतो. वजन जास्त असल्याने रिषभ हा स्टंट करु शकणार नाही, असं पाहणाऱ्याला वाटतं पण रिषभ तो स्टंट लिलया करतो.

 

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(Rishabh pant is Reason I Love Watching Test Cricket says Tymal Mills)