किंग खान शाहरुख क्रिकेटपटूच्या मदतीला धावला, कोरोनावरील उपचारासाठी मोलाची मदत

आयपीएलच्या स्थगितीनंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

  • Updated On - 5:52 pm, Tue, 25 May 21 Edited By: Sachin Patil
किंग खान शाहरुख क्रिकेटपटूच्या मदतीला धावला, कोरोनावरील उपचारासाठी मोलाची मदत
Shahrukh Khan

मुंबई : चोख नियम आणि प्रेक्षकांविना झालेल्या आयपीएलच्या सामन्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आणि एक एक खेळाडू कोरोनाबाधित आढळू लागले. त्यामुळे आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्थगितीनंतरही अनेक खेळाडू कोरोनाबाधित आढळत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. दरम्यान अशाच एका भारतीय खेळाडूच्या मदतीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) धावून आल्याची माहिती  क्रिकेटपटूने दिली. संदीप वॉरियर (Sandeep Warrier) असं या क्रिकेटपटूच नाव असून तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा खेळाडू आहे. (Sandeep Warrier says IPL team KKR owner Shahrukh Khan stood with me in Corona treatment)

आयपीएल 2021 मध्ये बायो-बबलच्या नियमांचे पालन करत असतानाही संदीपला कोरोनाची लागण झाली. केकेआर संघाचा खेळाडू असणाऱ्या संदीपची 2 मे रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने संघ व्यवस्थापनाला त्याची माहिती दिली आणि विलगीकरणात राहून उपचार घेण्यास सुरुवात केली. यावेळी शाहरुखने स्वत: त्याची विचारपूस करुन संघ व्यवस्थापनाकडून सर्व प्रकारच्या सुविधा संदीपला पुरवल्या होत्या.

आधी वाटलं साधा ताप असेल

संदीपने एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत सांगितले, ”आधी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र माझा सहकारी वरुण चक्रवर्ती याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आमची परत कोरोनाचाचणी करण्यात आली. तेव्हा मला थोडा ताप आला होता. मला वाटलं साधा तापा असेल, मात्र त्यानंतर कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर मला कोरोनाची बाधा झाल्याचे कळाले. माझी पत्नी जी डॉक्टर आहे तिनेच मला याबद्दलची माहिती दिली होती.”

शाहरुख सरांकडून सर्वांची विचारपूस

संदीप म्हणाला, ”आमच्या संघाचे डॉक्‍टर श्रीकांत, मॅनेजर वेन बेंटली आणि लॉजिस्टिक्‍स विभागाचे राजू कोरोना उपचारादरम्यान माझ्या आणि वरुणसोबत थांबून होते. आमचा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्यांनी सर्वोतोपरी मदत पुरवली. आयपीएल स्थगितीनंतर एका व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे शाहरुख सरांनी ही सर्व खेळाडूंची विचारपूस केली होती.”

पत्नीची मोलाची साथ

संदीपची पत्नी डॉक्टर असल्याने तिने संदीपची काळजी घेत त्याची सेवा केली. तिला देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यावर मात केल्यानंतर तिने संदीपची सेवा केली. यावेळी संदीपच्या प्रकृतीसाठी ती फोनवरुन सतत केकेआरच्या डॉक्टरांच्या संपर्कात होती. संदीपला यंदा आयपीएलमध्ये खेळायला मिळाले नसले, तरी 57 फर्स्‍ट क्‍लास सामन्यांत त्याच्या नावावर 186 विकेट आहेत. संदीप हा भारताच्या ए संघाचा सदस्यही आहे.

संबंधित बातम्या 

सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

(Sandeep Warrier says IPL team KKR owner Shahrukh Khan stood with me in Corona treatment)