Sourav Ganguly Health News Updates : सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, धमण्यांमध्ये दोन स्टेन्ट टाकले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर स्टेनटिंगद्वारे उपचार करण्यात आले आहेत.

Sourav Ganguly Health News Updates : सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, धमण्यांमध्ये दोन स्टेन्ट टाकले
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 9:26 PM

कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर स्टेनटिंगद्वारे उपचार करण्यात आले आहेत. अवघ्या 26 दिवसांमध्ये गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली. डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या धमण्यांमध्ये दोन नवे स्टेन्ट टाकण्यात आले असल्याची माहिती वुडलँडस रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. गांगुलीची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. (Sourav Ganguly undergoes fresh angioplasty, two more stents implanted)

अँजियोप्लास्टीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन सौरव गांगुलीची भेट घेतली. बॅनर्जी म्हणाल्या की, माझं सौरव गांगुली यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे, मी त्यांना पुढील वाटचालीसाटी देते. तत्पूर्वी ज्येष्ठ माकप नेते आणि बंगालचे पूर्व नगरविकास मंत्री अशोक भट्टाचार्यदेखील सौरव गांगुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. अपोलो

सौरव गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे बुधवारी त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सरोज मोंडल यांनी गांगुलीवर उपचार केले. डॉ. आफताब खान हे सौरव गांगुलीवर स्टेनटिंगची शस्त्रक्रिया करणार आहेत. काही दिवसांपूर्वी गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा गांगुलीची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता.

आधी हृदयविकाराचा सौम्य झटका

या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.

संबंधित बातम्या:

Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार

(Sourav Ganguly undergoes fresh angioplasty, two more stents implanted)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.