Sydney Test, Day 2: नव्या चेंडूसह भारताची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी, कांगारु आता ‘स्मिथ’भरोसे

सिडनी कसोटीमधील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.

Sydney Test, Day 2: नव्या चेंडूसह भारताची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी, कांगारु आता 'स्मिथ'भरोसे

सिडनी : सिडनी कसोटीमधील (Sydney Test) दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी शानदार अर्धशतकं झळकावत सामन्यावर पकड मिळवली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 गड्यांच्या बदल्यात 249 धावा उभारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ 76 धावांवर खेळत आहे. तर मार्नस लाबुशेन काही वेळापूर्वी 91 धावांवर बाद झाला आहे. टीम इंडियाकडून काल मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. (Steve Smith and Marnus Labuschgne shine on Day 2 of Sydney Test)

आज सकाळच्या सत्रात फिरकीपटू रवींद्र जडेजाने लाबूशेनला कर्णधार अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करुन आजच्या दिवसातलं पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर जडेजाने भरवशाच्या फलंदाज मॅथ्यू वेडला (13) बाद करुन आजच्या दिवसात टीम इंडियाला अजून एक यश मिळवून दिलं. त्यानंतर सिडनी कसोटीत 80 षटकांनंतर टीम इंडियाला नवा चंड़ू देण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी नव्या चेंडूसह भेदक गोलंदाजी सुरु केली. सकाळच्या सत्रातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने कॅमरॉन ग्रीनला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी माघारी धाडला.

जडेजाच्या फिरकीची जादू आजच्या दिवसात फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. एका बाजूला खेळपट्टीवर जम बसवलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजीचा सामना करत चांगल्या रनरनेटने धावा जमवणं सुरु असताना तेच फलंदाज जडेजाच्या गोलंदाजीवर अडखळत खेळत होते. आजच्या दिवसात टीम इंडियाने आतापर्यंत तीन फलंदाजांना बाद केलं आहे. त्यापैकी दोन विकेट्स जडेजाच्या नावावर आहेत. टीम इँडिया आता नव्या चेंडूसह गोलंदाजी करत असल्यामुळे कर्णधार रहाणेने पुन्हा एकदा चेंडू जलदगती गोलंदाजांच्या हाती सोपवला आहे. आता काही वेळ बुमराह-सिराज आणि नवदीप सैनीची गोलंदाजी पाहायाला मिळेल. चेंडू जुना झाल्यानंतर पुन्हा एकदा जडेजाची फिरकी अनुभवायला मिळेल.

स्मिथचं अर्धशतक

गेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरत असलेल्या स्टिव्ह स्मिथने आज जबाबदारीने खेळ केला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत सामन्यावर पकड मिळवली आहे. तसेच पाच महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे आता कांगारुंच्या संघाची भिस्त स्मिथवरच आहे. स्मिथने आतापर्यंत 159 चेंडूंचा सामना करत 11 चौकारांच्या सहाय्याने 76 धावा फटकावल्या आहेत. स्मिथने खेळपट्टीवर त्याचा चांगलाच जम बसवला आहे. आता त्याची साथ कोण देतंय हे पाहणं ओत्सुक्याचं ठरेल. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताचे जलदगती गोलंदाज विरुद्ध स्मिथ असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा

प्रत्येक सामन्यात कॅच सोडणारच, ऋषभ पंतने लाज आणली, नकोसा विक्रम

आयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता

(Steve Smith and Marnus Labuschgne shine on Day 2 of Sydney Test)

Published On - 7:44 am, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI