Video : ”तू इतका बारीक माझी बॅट तरी उचलेल का?”, सूर्यकुमार यादवकडून चहलची मस्करी

सूर्यकुमारने नुकतेच टीम इंडियामध्ये पदार्पण केले असून लवकरच श्रीलंका दौऱ्यावर तो युजवेंद्र चहलसोबत खेळताना दिसू शकतो.

Video : ''तू इतका बारीक माझी बॅट तरी उचलेल का?'', सूर्यकुमार यादवकडून चहलची मस्करी
yuzvendra chahal

मुंबई : सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना झाला असून तिकडेच इंग्लंडसोबत कसोटी मालिका (England Test Match) ही खेळणार आहे. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अजूनपर्यंत कसोटी संघात स्थान न मिळाल्याने तो घरीच आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असल्याचं दिसून येतंय. नुकतच मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्रामवरील एका मुलाखतीत सूर्याने युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) बारीकपणाची खिल्ली उडवली. (Suryakumar Yadav mocks Yuzvendra Chahal on his Thinness)

मुलाखती दरम्यान चहलचा विषय निघाला. त्यावेळी चहलच्या मते तुम्ही त्याची बॅट घेतली आहे? असा प्रश्न अँकरने विचारताच सूर्या म्हणाला ”मी त्याची बॅट घेतली नाही, उलट त्यानेच माझी बॅट घेतली आहे आणि माझी बॅट चहलच्या बॅटच्या तुलनेत अधिक जड आहे. त्यामुळे मी त्याला कित्येकदा म्हटलय की तू इतका बारीक आहेस, तुला माझी बॅट तरी कशी उचलेल.” या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.

सूर्याचे अप्रतिम आगमन

सूर्यकुमार यादवने नुकतेच मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघात पदार्पण केले. गेली अनेक वर्षे आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर देखील सूर्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. अखेर इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात स्थान मिळाल्यानंतर सूर्याने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवली. त्याने पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरसारख्या उत्कृष्ठ गोलंदाजाला षटकार ठोकत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्याच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकत भारताला विजयश्री मिळवून दिली.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवडीची शक्यता

आयपीएलमधील अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळालेला 30 वर्षीय सूर्यकुमार यादव टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतो. मात्र अद्यापपर्यंत श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा होणे बाकी आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसह टी-20 सामनेही खेळणार आहे.

संबंधित बातम्या 

सुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…

Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Video : है तय्यार हम! भारतीय क्रिकेटपटूंचा सराव जोमात सुरु

(Suryakumar Yadav mocks Yuzvendra Chahal on his Thinness)