T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting)  आयोजन केलं होतं. यात आगामी टी-20 विश्वचषक, आयपीएल 2021 या महत्त्वांच्या स्पर्धांबाबत निर्णय अपेक्षित होता.

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?
आयसीसी

मुंबई : आगामी टी-20 विश्वचषक, आयपीएल 2021 या महत्त्वांच्या स्पर्धांबाबत  निर्णयासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting)  आयोजन केलं होतं. या बैठकीकडे सर्वंच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. या बैठकीत कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने युएईत होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. तर टी-20 विश्वचषक भारतात घेण्याबाबत 1 जून रोजी अंतिम बैठक होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (T 20 World cup held in india what decided in BCCI SGM meeting)

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

विश्वचषकाच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाणे तसेच कोरोनासंबधी सर्व बाबींची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर विश्वचषक आयोजनात परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे.

IPL 2021 चे आयोजन

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे (IPL 2021) सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

स्थानिक खेळाडूंबद्दलही चर्चा

या बैठकीत स्थानिक खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा रद्द झाल्याने सोसाव्या लागण्याऱ्या आर्थिक अडचणींवर चर्चा केली जाणार होती. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याने स्थानिक खेळाडूंना दिलासा मिळालेला नाही. खेळाडूंना कोणतीही आर्थिक मदत जाहिर केलेली नाही. आयपीएलमध्ये केवळ 73 स्थानिक खेळाडूंना संधी मिळते. उर्वरीत खेळाडू केवळ रणजी चषक (Ranji Trophy), विजय हजारे (Vijay Hajare Trophy) आणि सैय्यद मुश्ताक अली चषक (Sayyed Mushtak Ali Trophy) अशा स्पर्धा खेळून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात. त्यामुळे इतर स्पर्धांबाबत ही योग्य निर्णय होणे अपेक्षित होते.