Captain : कॅप्टन असावा तर असा! माझ्या डोक्यात नेहमी हेच सुरू असतं की…’; रोहित शर्माचे पत्रकार परिषदेमध्ये मोठे वक्तव्य
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याची कसोटी मालिका पार पडली. रोहित शर्मा याने राहुलची निवड का झाली? मैदानात असताना त्याच्या डोक्यात काय सुरू असतं याबद्दल खुलासा केला आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेमधील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. या मालिकेमध्ये खेळण्याआधी टीम इंडिया अनेक दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणार आहे.
आम्ही गेले अनेक दिवस कसोटी क्रिकेट खेळलो नसलो तरी त्याचा फार काही परिणाम आमच्या खेळावर होणार नाही. मैदानात उतरल्यावर माझ्या डोक्यात कायम हेच सुरू असतं की हा सामना कसा जिंकू शकतो. आमच्यातील प्रत्येकजण जे खेळतो त्या प्रत्येकाची जिंकण्याची इच्छा असते, असं रोहित शर्मा यांनी म्हटलं आहे. रोहित शर्मा कॅप्टन झाल्यापासून टीम इंडियाचा आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये दबदबा राहिला आहे.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2022 आणि वन डे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपल्य नेतृत्त्वात जिंकवला. रोहित शर्मा सर्व आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एक कॅप्टन म्हणून आपली छाप सोडली. तो कधीही वैयक्तिक धावांकडे पाहून खेळला नाही. जशी टीमला गरज असेल तशा पद्धतीने त्याने बॅटींग केली. रोहित प्रत्येकवेळी म्हणतो की, कोणी किती शतके केली त्यापेक्षा तुमची टीम जिंकली का हे महत्त्वाचं आहे.
सगळ्या संघांना भारतामध्ये हरवताना खूप मजा येते. बांगलादेशच्या खेळाडूंना मजा करूदेत. ज्यावेळी इंग्लंडचा संघ आला होता तेव्हा त्यांनीही पत्रकार परिषदेमध्ये खूप काही म्हटलं होतं. मात्र आम्ही त्याकडे काही लक्ष देत नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला. यावेळी रोहित शर्मा याने के.एल. राहुलची का निवड झाली यावरही भाष्य केलं. केएल राहुलकडे कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. तो या फॉरमॅटमध्ये अयशस्वी होण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही, असं रोहित म्हणाला.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.