सिराजची कोटीची उड्डाणं, अवघी 1 वनडे मॅच खेळलेल्या मोहम्मदला BCCI देणार इतकं वेतन

बीसीसीआयने (BCCI) 15 मे ला खेळाडूंचे वर्षभराच्या कालावधीसाठी वार्षिक कराराची (Annual Player Retainership) घोषणा केली. यानुसार मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) सी या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:06 PM, 17 Apr 2021
सिराजची कोटीची उड्डाणं, अवघी 1 वनडे मॅच खेळलेल्या मोहम्मदला BCCI देणार इतकं वेतन
बीसीसीआयने (BCCI) 15 मे ला खेळाडूंचे वर्षभराच्या कालावधीसाठी वार्षिक कराराची (Annual Player Retainership) घोषणा केली. यानुसार मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) सी या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) 2 दिवसांपूर्वी खेळाडूंचे वर्षभराच्या कालावधीसाठी वार्षिक कराराची (Annual Player Retainership) घोषणा केली. यामध्ये बीसीसीआयने 4 श्रेणीमध्ये खेळाडूंची वर्गवारी करत त्यांची वेतन जाहीर केले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) नशीब फळफळलं आहे. सिराजला वर्षभरासाठी बीसीसीआयने सी श्रेणीत स्थान दिले आहे. त्यामुळे सिराजला या कालावधीसाठी 1 कोटी मिळणार आहे. (team india mohammed siraj include in c grade for bcci annual player retainership)

4 श्रेणीत खेळाडूंची वर्गवारी

बीसीसीआयने कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची वर्गवारी केली आहे. त्यानुसार खेळाडूंचं वेतन जाहीर केलं आहे. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार प्रकारात खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

श्रेणीनिहाय वेतन

Grade A+ : 7 कोटी
Grade A : 5 कोटी
Grade B : 3 कोटी
Grade C : 1 कोटी

मोहम्मद सिराजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

मोहम्‍मद सिराजने आतापर्यंत 1 वनडे, 3 टी20 आणि 5 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. सिराजने एकमेव वनडे सामन्यात 10 ओव्हर्स बोलिंग केली. त्याने यामध्ये 76 धावा लुटल्या. मात्र त्याला विकेट घेण्यात यश आले नाही. याशिवाय सिराजने 3 टी 20 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. त्याने हे 3 विकेट्स बांगलादेश, न्‍यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध घेतले आहेत. मात्र तो महागडा ठरला. सिराजने बांगलादेश विरुद्ध 4 षटकांमध्ये 50 धावा देत 1 विकेट घेतली. तर न्‍यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 53 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली.

तसेच सिराजने श्रीलंका विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 45 धावा मोजून 1 विकेट मिळवली. त्या व्यतिरिक्त सिराजने 5 टेस्ट मॅचमध्ये एकूण 16 विकेट्स घेतल्या. सिराज या 5 पैकी 3 सामने ऑस्ट्रेलिया तर उर्वरित 2 सामने इंग्लंड विरुद्ध खेळला आहे. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या 13 तर इंग्लंडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

कोणत्या श्रेणीत कोणाला स्थान?

बीसीसीआयने ए प्लस श्रेणीत टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. त्यामुळे या तिकडीसाठी वर्षभरासाठी बीसीसीआयने 7 कोटी मोजले आहेत.

ए श्रेणीत

बीसीसीआयने रवीचंद्रन अश्विन, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, के एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे या खेळाडूंना 5 कोटी मिळणार आहेत.

बी श्रेणीत

बीसीसीआयने मयंक अगरवाल, रिद्धीमान साहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या खेळाडूंना स्थान दिलं आहे. यामुळे या खेळाडूंना 3 कोटी मिळणार आहे.

सी श्रेणीत एकूण 10 जणांचा समावेश

बीसीसीआयने सी श्रेणीत एकूण 10 खेळाडूंचा समावेश केला आहे. यात कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे. यामुळे या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

MI vs SRH Playing 11, IPL 2021 | मुंबई विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार लढत, अशी असेल दोन्ही संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन

IPL 2021 MI vs SRH Head to Head | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने, ‘या’ 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार

(team india mohammed siraj include in c grade for bcci annual player retainership)