WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

या विशेष मिशनसाठी भारताचा संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार असून त्यानंतर पुढील 72 तास कोहलीच्या नेतृत्वाखाली हे मिशन पार पडणार आहे.

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा 'सिक्रेट प्लॅन', 72 तासांच विशेष मिशन
भारतीय संघ

साऊदम्पटन : क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल. (Team India on secret mission Against New Zealand for WTC Final in Southampton)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदम्पटन येथे सुरु होईल. त्यासाठी टीम इंडिया  2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.  मात्र कोरोनाच्या नियमांमुळे संपूर्ण संघाला तीन दिवस म्हणजे 72 तास आपल्या रुम्समध्येच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यावेळी मैदानावर सराव करु शकणार नसल्याने संपूर्ण संघ रुम्समध्ये राहूनच सामन्याची रणनीती आखेल. याचवेळी इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs NewZeaLand) यांच्यात सराव सामना खेळवला जाणार आहे. हा सामना टी.व्हीवर पाहत न्यूझीलंड्च्या खेळाडूंचे निरीक्षण करुन भारतीय संघाला आपली रणनीती आखण्यास मदत होणार आहे.

संपूर्ण संघ विलगीकरणात

कोरोनाच्या संकटामुळे भारतीय संघाला सध्या विलगीकरणात राहावे लागत आहे. भारतीय खेळाडूंना आधी भारतातील त्यानंतर इंग्लंडमधील बायो-बबलचा (Bio Bubble) सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार असून तोवर सर्व खेळाडू विलगीकरणात आहेत. इंग्लंडला गेल्यानंतरही संपूर्ण संघाला विलगीकरणात राहावे लागणार आहे. या दोन्ही बायो-बबलमध्ये खेळाडूंची वारंवार कोरोना चाचणी केली जाईल.

भारताचे शिलेदार तयार

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात असणार आहेत. या दौऱ्यात आधी डब्लूटीसीचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामने भारत खेळणार आहे.

डब्लूटीसी फायनलसाठी एक अतिरिक्त दिवस

क्रिकेट इतिहासात प्रथमच आयोजित केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या साउदप्टन येथील मैदानात हा सामना खेळवला जाईल. त्या काळात तेथे पावसाचे वातावरण असण्याची शक्यता असल्याने सामन्यासाठी आयसीसीने 23 जूनचा एक अतिरिक्त दिवस राखीव ठेवला आहे.

संबधित बातम्या

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

(Team India on secret mission Against New Zealand for WTC Final in Southampton)