England Tour India 2021 | इंग्लंडविरुद्ध मुंबईकर तिकडी सज्ज, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर चेन्नईत दाखल

इंग्लंडविरोधातील पहिले 2 कसोटी सामने (team india vs england 2021) चेन्नईत खेळण्यात येणार आहेत.

England Tour India 2021 |  इंग्लंडविरुद्ध मुंबईकर तिकडी सज्ज, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर चेन्नईत दाखल
अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 12:26 PM

चेन्नई : अवघ्या काही दिवसांनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (England Tour India 2021) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या कसोटीसाठी टीम इंडियाचे स्टार खेळाडू  मुंबईकर रोहित शर्मा (Rohit Sharma) , अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ही तिकडी आज (27 जानेवारी) मंगळवारी चेन्नईमध्ये (Chennai) दाखल झाली आहे. हे तिघेही चेन्नईत बायो बबलमध्ये सुरक्षित वातावरणात राहणार आहेत. याबाबतची माहिती टीम इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. (team india vs england 2021 ajinkya rahane  rohit sharma and shardul thakur reach at chennai for test series)

तसेच कर्णधार विराट कोहली आणि उर्वरित खेळाडू बुधवारी चेन्नईत पोहचणार आहेत.  इंग्लंडचे बेन स्टोक्स, जो रुटही रविवारी भारतात दाखल झाले. त्यांचेही उर्वरित खेळाडू श्रीलंकेवरुन भारतात येणार आहेत. इंग्लंडने श्रीलंकेचा कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवला आहे.

कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. इंग्लंडचे खेळाडू श्रीलंकेवरुन भारतात येत आहेत. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात दाखल झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटाईन नियमांमधून सवलत देण्यात आली होती. यामुळे इंग्लंडविरोधातील मालिकेत खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही संघांना लीला पॅलेस या हॉटेलमध्ये 6 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तामिळनाडू क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

या कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13-17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली. हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. तर ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. यामुळे दोन्ही संघाचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, तसेच कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

(team india vs england 2021 ajinkya rahane  rohit sharma and shardul thakur reach at chennai for test series)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.