T Natrajan | थंगारासू नटराजनची रथातून मिरवणूक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

नटराजनचं त्याच्या गावी जंगी स्वागत करण्यात आलं. थंगारासूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं.

T Natrajan | थंगारासू नटराजनची रथातून मिरवणूक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना
टी नटराजनची विजयी मिरवणूक.
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 12:05 PM

तामिळनाडू : कांगारुंवर ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडू (Team India) मायदेशी परतले. यावेळेस या खेळाडूंचं आपल्या राहत्या शहरामध्ये दणक्यात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा यॉर्कर किंग थंगारासू नटराजनचंही  (Yorker King T Natrajan) त्याच्या गावात जंगी राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं. तामिळनाडूमधील चिन्नपमपट्टी हे नटराजनचं गाव. नटराजन गावात पोहचला. यानंतर नटराजनला पाहण्यासाठी संपूर्ण तामिळनाडूमधील जनेतेने एकच गर्दी केली होती. (thangarasu Natarajan royal welcomed by villagers in chinnapampatti after historic victory over australia)

नटराजनची विजयी मिरवणूक

नटराजनची घोड्याच्या रथातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस नटराजनच्या नावाच जयजयकार करण्यात आला. त्याच्यावर पुष्पवर्षाव केला गेला. आपल्या सुपूत्राने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नटराजनच्या या मिरवणुकीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज वींरेद्र सेहवाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सेहवागने केलेलं ट्विट

“स्वागत नही करोगे हमारा, हा भारत आहे. इथे क्रिकेट खेळ नाही, तर त्यापेक्षा खूप काही आह. नटराजनचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. काय कमाल आहे”, असं म्हणत सेहवागने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात तिन्ही फॉरमेटमध्ये पदार्पण

नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक नेट (राखीव) बोलर म्हणून निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. ही दुखापत नटराजनच्या पथ्यावर पडली. यामुळे नटराजनला एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. नटराजनने या संधीचं सोनं केलं. टीम मॅनेजमेंटने दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. नटराजनने निर्णायक क्षणी भारताला विकेट्स मिळवून दिले. नटराजनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने एलिमिनेटर सामन्यात धोकादायक असलेला मिस्टर 360 एबीडी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं होतं. तसेच तो आयपीएलच्या या 13 वा मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकणारा गोलंदाज होता. त्याने या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

दरम्यान नटराजनचे इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यांसाठी त्याला संधी मिळेल, अशी आशा नटराजनच्या चाहत्यांना आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

T Narajan | ‘यॉर्कर किंग’ थंगारासू नटराजन कसोटी पदार्पणासाठी सज्ज, सरावादरम्यान भन्नाट कॅच

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(thangarasu Natarajan royal welcomed by villagers in chinnapampatti after historic victory over australia)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.