खेळाडू अतिशहाणपणा करत होता, पंचानं सगळी उतरवली

असं म्हणतात की क्रिकेटमध्ये अतिशहानपणा चालत नाही. कोणी साधी हुशारी जरी केली तरी ते क्रिकेटच्या मैदानावरील कॅमेऱ्यात कैद होतं. त्याला शिक्षा देखील होते. असंच काहीसं इंग्लंडमध्ये घडलंय.

खेळाडू अतिशहाणपणा करत होता, पंचानं सगळी उतरवली
इंग्लंडमध्ये फिल्डरला पंचानं शांतच केलं. Image Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 6:49 PM

नवी दिल्ली : हुशारी केली की ती कधी ना कधी समोर येतेच. विशेष म्हणजे खेळात (Sports) कोणताही अतिशहानपणा चालत नाही. तो लगेच पकडलाही जातो. असे अनेक उदाहरणं आपण पाहिले देखील असतील.  क्रिकेटच्या (Cricket) मैदानावरुन खासकरून असे प्रकार पहायला मिळतात. अनेकदा तर पंचाचं ऐकलं देखील जात नाही. अनेकदा पंचाच्या निर्णयाचा विरोधही केला जातो. हा प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतो. पण, इंग्लंडच्या (England) मैदानावर थोडा वेगळाच प्रकार समोर आलाय. तो नेमका काय आहे, ते जाणून घेऊया…

इंग्लंडमध्ये नेमकं काय घडलं?

इंग्लंडमध्ये क्षेत्ररक्षकानं हुशारी दाखवली पंचानं थेट दंडच ठोठावल्याचं समोर आलंय. ट्रेंट ब्रिज येथे एकदिवसीय कप फायनल दरम्यान ही घटना घडली. जेतेपदाच्या लढतीत केंट आणि लँकेशायर आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी करताना केंटने 50 षटकांत 306/6 धावा केल्या आणि लँकेशायरसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.

हातमोजे काढून फेकले

लँकेशायरनं फलंदाजीला सुरुवात केली. दुसऱ्या डावात अर्धा खेळ झाला. जवळपास 21वं षटक होतं. स्टीव्हन क्रॉफ्ट आणि कीटन जेनिंग्स क्रीजवर होते. दोन्ही फलंदाज वेगानं धावले. यष्टिरक्षक ऑली रॉबिन्सनही चेंडूच्या मागे धावला. पण, त्याने स्टंपसमोरचे हातमोजे काढून फेकले.

पाच पेनल्टी धावा

यष्टिरक्षकाने चेंडू स्टंपच्या दिशेनं फेकला. पण 27 वर्षीय क्षेत्ररक्षक हॅरी फिंचने यष्टीरक्षक ऑली रॉबिन्सनचे ग्लोव्हज उचलले आणि चेंडू रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे लँकेशायरला पाच पेनल्टी धावा मिळाल्या.

नियम 28 चं उल्लंघन

नियम 28 चं उल्लंघन केल्यानं लँकेशायरला पाच धावांचा दंड देण्यात आला. मात्र, या चुकीचा फटका फिंच आणि केंटला बसला नाही आणि त्यांनी हा सामना 21 धावांनी जिंकून ट्रॉफी जिंकली. लँकेशायरचा डाव 48.4 षटकांत 285 धावांत आटोपला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.