T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

यंदा भारतात होऊ घातलेला क्रिकेटचा टी - 20 वर्ल्ड कप (T-20 World cup) कोरोनाच्या संकटामुळे परदेशात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक 'हा' संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित
वसीम अक्रम

कराची : क्रिकेटचा टी-20 विश्वचषक यंदा पार पडणार असून इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सील (ICC) विश्वचषकाच्या तयारीला लागली आहे. दरम्यान या विश्वचषका संबधित एक मोठ विधान पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम (Former Pakistani Cricketer Wasim Akram) यांनी केलं आहे. वसीम अक्रम यांनी त्यांच्या मते विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करतील अशा चार संघाची नाव घोषित केली असून कोण विजेता होईल हेही सांगितलं आहे. (This Four teams will top in T20 World Cup says Wasim Akram)

वसीम यांच्या मते भारत (India), ऑस्ट्रेलिया(Australia), वेस्ट इंडीज (West indies) आणि इंग्लंड (England) हे चार संघ यंदाच्या टी-20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करतील. हे चारही संघ सध्या अतिशय उत्तम क्रिकेट खेळतात. गोलंदाजीसह फलंदाजाचीही मोठी फौज या चौघांकडे असल्याचं ही वसीम यांनी म्हटलं आहे.

कोण असेल विजेता?

ARY न्यूज या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वसीम यांनी ही सर्व माहिती दिली. तसंच टॉप-4 मध्ये असेल्या संघातील भारत हा सामना जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार असल्यांचही त्यांनी म्हटलं
आहे. दरम्यान वेस्ट इंडीजचे खेळाडू जर पूर्ण जोमात खेळले तर तेही स्पर्धा जिंकू शकतात अशी आशा वसीम यांनी वर्तवली आहे.

कुठे होणार टी-20 विश्वचषक?

यंदा क्रिकेटचा टी – 20 वर्ल्ड कप (T20 World cup) भारतात होणार होता. ऑक्टोबर ते नोव्हेबरच्यादरम्यान ही स्पर्धा घेतली जाणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धेचे ठिकाण बदलले जाऊ
शकते. याबातचा अंतिम निर्णय 1 जून रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सीलच्या (ICC)मीटींगमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान स्पर्धा भारतात घेतल्यास युएईत (UAE) होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल

मास्क घातला नाही म्हणून मिताली राजने मिश्किल अंदाज केलं वडिलांना ट्रोल, ट्विट व्हायरल

(This Four teams will top in T20 World Cup says Wasim Akram)