असं काय झालं की न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लाईव्ह शोदरम्यान रडायला लागला?, IPL मधील जीवघेणा अनुभव!

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टिम सीफर्ट (Tim Seifert) IPL 2020 पासून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासोबत आहे. बदली खेळाडू म्हणून सीफर्टला संघात घेण्यात आले होते.

असं काय झालं की न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लाईव्ह शोदरम्यान रडायला लागला?, IPL मधील जीवघेणा अनुभव!
tim seifert cried

वेलिंग्टन : कोरोनामुळे (corona) जगभरातील सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना शारीरिक बाधांसह मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टिम सीफर्टलाही (Tim Seifert)  आयपीएल (IPL 2021) दरम्यान कोरोनाची बाधा झाली. आता सीफर्टने एका मुलाखतीदरम्यान आपला अनुभव सांगितलं. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले.   (New Zealand cricketer and IPL player from Kolkata Knight Riders KKR  Tim Seifert gets emotional during live while talking about IPL 2021 coronavirus experience)

कोरोना उद्रेकामुळे यंदाची आयपीएल रद्द झाली. त्यामुळे सर्व परदेशी खेळाडूंना चार्टड विमानाने आपआपल्या घरी पाठवण्यात आलं. सीफर्टला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत भारतात होता. आता त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो मायदेशी म्हणजे न्यूझीलंडला परतला.  सध्या तो न्यूझीलंडमध्ये 14 दिवसांच्या विलगीकरणात आहे.

सीफर्टने सांगितला आयपीएलमधील अनुभव

आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून खेळणाऱ्या सीफर्टने एका Live मुलाखतीदरम्यान आपला अनुभव सांगितला.  ”माझा कोरोना रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याचे मला चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजरकडून कळाले. ही गोष्ट कळताच मी सुन्न झालो, काय करावं काहीच कळत नव्हतं. मी ज्या काही नकारात्मक गोष्टी ऐकत आलो होतो त्या माझ्या डोक्यात फिरु लागल्या” असं सीफर्ट म्हणाला. मात्र  हा अनुभव सांगतानाच सीफर्टला गहिवरुन आलं. त्यानंतर काही वेळ थांबून सीफर्टने पुन्हा बोलायला सुरुवात केली

दोन वर्षांपासून केकेआर संघात

आयपीएल 2020 मध्ये केकेआरचा अमेरिकन खेळाडू अली खानने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर टिम सीफर्टला कोलकात्याने बदली खेळाडू म्हणून सहभागी करुन घेतले. आयपीएल 2021 मध्ये सीफर्टला कायम ठेवण्यात आले, मात्र सीफर्टला अजूनही मैदानात उतरवलं नाही.

मदतीसाठी आभार

सीफर्टने कोरोनाबाधित असताना केलेल्या मदतीसाठी केकेआरचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brendon mccullum) आणि चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांचे आभार मानले.  ”माझे प्रशिक्षक, तसेच केकेआर आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोरोनाकाळात फार मदत केली, मला सुखरुपपणे घरी पाठवण्याचेही त्यांनी संपूर्ण नियोजन केले.’ असं सीफर्ट म्हणाला.

IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये?

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार 29 मे रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सर्वसाधारण बैठकीमध्ये (SGM) याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आलं होतं.

इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर आहे. अहवालानुसार, बीसीसीआय दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन सामन्यांमधील अंतर 5 दिवसांनी कमी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, बीसीसीआयने अद्याप यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) औपचारिक विनंती केलेली नाही.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार? 

(New Zealand cricketer and IPL player from Kolkata Knight Riders KKR  Tim Seifert gets emotional during live while talking about IPL 2021 coronavirus experience)