मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना होणार आहे. आयपीएलच्या पॉईट्स टेबलचा विचार केल्यास पंजाब किंग्स सातव्या स्थानी आहे. पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना होणार असून सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. त्यापूर्वी तीन वाजता टॉस केला जाईल.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 7 मे (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी तीन वाजता होईल.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.