VIDEO : दिनेश थोडक्यात वाचला, नशिबानं साथ दिली आणि मॅक्सवेल…

Ind vs Aus 3rd T20I : दिनेश कार्तिकला कर्णधार रोहित शर्मानं समजावलं, ते अवघ्या क्रिकेटविश्वानं पाहिलं. पुन्हा एकदा असंच काहीसं घडणार होतं. पण, दिनेशच्या नशिबानं साथ दिली.

VIDEO : दिनेश थोडक्यात वाचला, नशिबानं साथ दिली आणि मॅक्सवेल...
हा व्हिडीओ बघाचImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 9:19 PM

 नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियानं (Team India) टॉस जिंकला (toss win) आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असून त्यांच्या संघातील खेळाडू चांगलेच जोमात दिसतायत. पण, ऑस्ट्रेलिया संघातील ग्लेन मॅक्सवेल फ्लॉप ठरलाय. मालिकेतील आजच्या निर्णायक सामन्यात त्यानं 11 चेंडूत सहा धावा केल्या आणि तो धावबाद झाला. यावेळी असं काही घडलं की ज्यामुळे दिनेश कार्तिकच्या नशिबानं साथ दिली आणि सगळयांना आश्चर्य वाटलं.

नेमकं काय घडलं?

षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू लेग साइडला गेला. त्यानं दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण, अक्षर पटेलनं अचूक थ्रो मारला. मॅक्सवेलचं बाद होणं निश्चितच होतं. पण, रिप्लेमध्ये कार्तिकचा हात चेंडूपूर्वी स्टंपला लागल्याचं दिसून आलं.

हा व्हिडीओ पाहा

हेही ट्विट पाहा

बेल सुरक्षित पण…

मॅक्सवेल बाद होण्याची शंका वाढल्यानं अमोल मुझुमदार-रुसी मोदी यांच्या क्लबमध्ये सामील झालेल्या तिसर्‍या पंचांनी अनेकदा रिप्ले पाहिला. यात कार्तिकच्या हातामुळे फक्त एक बेल खाली पडल्याचं स्पष्ट झालं. तर दुसरे बेल सुरक्षित होते. चेंडू मारल्यानंतर दुसऱ्या बेलचा प्रकाश पडला आणि बेल स्टंपपासून वेगळे झाले. यामुळे मॅक्सवेलला आऊट देण्यात आलं.

हे ट्विट पाहा

आऊट झाला पण शंका राहिलीच

मॅक्सवेलला आपल्या बाद करण्यावर विश्वास बसला नाही आणि तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रिप्ले पाहिल्यावर मॅक्सला शंका राहिलीच.

नियम काय आहे?

  1. चेंडू आदळल्यावर किमान एक स्टंप जमिनीवरून उखडला गेला पाहिजे
  2. या सामन्यात अक्षरच्या थ्रोने एकही स्टंप उखडला नाही

…तर खैर नव्हती

कर्णधार रोहित शर्मानं चुकणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी अनेकदा समज दिली आहे. आताही दिनेश कार्तिक थोड्याहून वाचला. त्याला नशिबानं साथ दिली आणि मॅक्सवेल आऊट झाला.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.