‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा तडाखा, 26 चेंडूत ठोकल्या 136 धावा, सचिन-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक

ख्रिस गेलने (Chris Gayle) या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या खेळीत उत्तुंग चौकार आणि षटकार खेचले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:49 PM, 24 Feb 2021
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा तडाखा, 26 चेंडूत ठोकल्या 136 धावा, सचिन-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
ख्रिस गेलने (Chris Gayle) या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या खेळीत उत्तुंग चौकार आणि षटकार खेचले.

कॅनबेरा : वनडे क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आजच्याच दिवशी 11 वर्षांपूर्वी पहिलवहिलं द्विशतक लगावलं. सचिनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ही कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनेही (Chris Gayle) वनडेमध्ये डबल सेंच्युरी लगावण्याची कामगिरी आजच्या दिवशी केली होती. गेलने आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2015 ला वनडेमधील सर्वात वेगवान द्विशतक लगावण्याची कामगिरी केली. गेलने अवघ्या 138 चेंडूत ही खेळी केली. गेलने झिंबाब्वे विरुद्ध ही खेळी केली होती. (West Indies batsman Chris Gayle hit a double century in ODI cricket against Zimbabwe on 24 february 2015 on this day)

नक्की काय घडलं?

विंडिजने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. विंडिजची सुरुवात निराशाजनक राहिली. ड्वेन स्मिथ शून्यावर बाद झाला. यानंतर गेलच्या जोडीला मार्लेन सॅम्युएल्स मैदानात आला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 298 चेंडूत 372 धावांची नाबाद भागीदारी केली. गेलने या दरम्यान जोरदार फटकेबाजी करत शतक, दीडशतक आणि त्यानंतर अवघ्या 138 चेंडूद्वारे द्विशतक पूर्ण केलं. गेलने आपल्या एकूण खेळीत 147 बोलमध्ये 16 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने 215 धावा केल्या. म्हणजेच गेलने अवघ्या 26 चेंडूमध्ये फोर आणि सिक्सच्या मदतीने 136 धावा चोपल्या. पण गेल सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.

गेल आणि सॅम्युएलसची रेकॉर्डब्रेक भागीदारी

पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर सॅम्युएल्स गेलला चांगली साथ दिली. सॅम्युएल्सनेही 133 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत सॅम्युएल्सने 156 चेंडूंच्या मदतीने 11 चौकार आणि 3 सिक्स मारले. सॅम्युएल्स आणि गेलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वाधिक धावांची भागीदारी केली. या दोघांनी 372 धावांची पार्टनरशीप केली.

याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या जोडीच्या नावे होत्या. या दोघांनी 1999 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 331 धावांची भागीदारी केली. तर सौरव गांगुली आणि द्रविडने याच वर्षात श्रीलंका विरोधात दुसऱ्या विकेटसाठी 318 धावा जोडल्या होत्या. दरम्यान विडिंजने निर्धारित 50 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 372 धावा केल्या. यामुळे झिंबाब्वेला विजयासाठी 373 धावांचे तगडे आव्हान मिळाले.

मात्र झिंबाब्वेचा 44.3 षटकांमध्ये 289 धावांवर डाव आटोपला. यामुळे विंडिजचा 73 धावांनी डकवर्थ लुईस नियमांनुसार विजय झाला. दरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यत 8 द्विशतक लगावण्याची कामगिरी विविध फलंदाजांनी केली आहे. टीम इंडियाच्या रोहित शर्माने सर्वाधिक 3 वेळा ही कामगिरी केली आहे. तर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गुप्टिल आणि फखर जमानने प्रत्येकी 1 वेळा ही अद्भूत द्विशतकी खेळी केली आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 3rd test | कसोटी कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात इशांत शर्माची झोकात सुरुवात, 3 ऱ्या ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का

Motera Stadium | जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, वाचा का आहे खास

(West Indies batsman Chris Gayle hit a double century in ODI cricket against Zimbabwe on 24 february 2015 on this day)