पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रीणीलाच बनवले जीवनसाथी

आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) लग्न केलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याने याबाबतची माहिती दिली.

पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रीणीलाच बनवले जीवनसाथी
निकोलस पूरन

मुंबई : वेस्ट इंडिज संघाचा आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळणारा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) लग्नबंधनात अडकला आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. निकोलस पूरनचा नोव्हेंबर, 2020 मध्ये बालपणीची मैत्रीण कॅथरीना मिग्युएल (Kathrina Miguel) बरोबर साखरपुडा पार पडला होता. तिच्यासोबतच लग्न करत निकोलसने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. (West indies Cricketer Punjab Kings Player Nicholas Pooran Marries Kathrina Miguel)

 

View this post on Instagram

 

A post shared by NickyP (@nicholaspooran)

या फोटोंना निकोलसने एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. निकोलसने लिहलंय, ‘जीजसने मला जीवनात खूप काही दिलंय. पण तुझ्यापेक्षा मोठ मला काहीच नाही. मिस्टर आणि मिसेज पूरन यांचा स्वागत करा.’  पूरनची पत्नी कॅथरीना आयपीएलमध्ये अनेकदा दिसली असून पंजाबच्या सामन्यासाठी ती मैदानात उपस्थित असायची. निकोलस आणि कॅथरीना लहाणपणीचे मित्र-मैत्रीण आहेत. ते मागील सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. निकोलससारखाच कॅथरिनाने देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. तिने फोटोसोबत लिहिलंय की, ‘जीजसनेच निकोलसला माझा जीवनसाथी म्हणून निवडलं आहे आणि माझ्या प्रेमासोबतच लग्न करत असल्याने स्वत:ला खूप लकी मानते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Alyssa Miguel💋 (@kathrina_miguel)

निकोलसची क्रिकेट कारकिर्द

मागील काही काळापासून निकोलसला आयपीएलमध्ये हवा तसा सूर गवसत नाही. यष्टीरक्षक असणारा निकोलस कर्णधार लोकेश राहुल यष्टीरक्षण करत असल्याने त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी पडत नाही. त्यात फलंदाजीत ही IPL 2021 च्या आतापर्यंत झालेल्या सामन्यांत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. याआधी आयपीएल 2020 मध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती. आतापर्यंत निकोलसने 28 आयपीएल सामन्यात 157.76 च्या सरासरीने 549 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकोलसने वेस्ट इंडिज संघाकडून 25 एकदिवसीय सामन्यात 49.1 च्या सरासरीने 982 धावा केल्या आहेत. तसेच 27 टी-20 सामन्यातही निकोलसच्या नावावर 392 धावा आहेत.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(West indies Cricketer Punjab Kings Player Nicholas Pooran Marries Kathrina Miguel)