विराट कोहलीने प्रीति झिंटाला फोनमध्ये काय दाखवलं? अभिनेत्रीने केला खुलासा
आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि प्रीति झिंटा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत प्रीति झिंटा विराट कोहलीच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहते आणि जोरात हसताना दिसत आहे. हा फोटोबाबत प्रीति झिंटाने अखेर खुलासा केला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत 20 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना पंजाबचं होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने आपल्या पहिल्या पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात आरसीबीने 7 गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 73 धावांची खेळी खेळली. तसेच विजयानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला डिवचलं. पण त्यांच्यातील हे चित्र मस्करीचा भाग होता. पण त्यानंतर पंजाब किंग्सची सहमालकीन प्रीति झिंटा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.या फोटोत विराट कोहली आपल्या मोबाईलमध्ये प्रीति झिंटाला काहीतरी दाखवताना दिसत आहे. ते पाहताना प्रीति झिंटा एकदम खूश झाल्याची दिसत आहे. पण विराट कोहलीने नेमकं काय दाखवलं याची उत्सुकता होती. अखेर प्रीति झिंटाने विराट कोहली काय दाखवलं? त्याबाबतचा खुलासा केला आहे.
प्रीति झिंटाने एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. तसेच याबाबतचा खुलासा सोशल मीडियावर थेट केला आहे. एका चाहत्याने प्रीति झिंटाचा फोटो शेअर करत विचारलं की, या व्हायरल होत असलेल्या फोटो दरम्यान तुमची काय चर्चा झाली? तेव्हा प्रीति झिंटाने सांगितलं की, ‘आम्ही एकमेकांना आमच्या मुलांचे फोटो दाखवत होतो. तसेच त्यांच्याबाबत चर्चा करत होतो.’
We were showing each other pictures of our children & talking about them ! Time does fly… When I first met Virat 18 years ago, he was a spirited teenager buzzing with talent & fire – today he still has that fire & is an icon & a very sweet & doting father ❤️ https://t.co/FNFXLRR7Wi
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 28, 2025
‘जेव्हा 18 वर्षापूर्वी मी विराट कोहलीला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो एक उत्साही तरूण होता. त्याच्याकडे क्षमता आणि काहीतरी करण्याची आग धगधगत होती. आजही त्यात तीच प्रतिभा आहे. आता तो एक आदर्श आहे. तसेच खूप प्रेमळ आणि दयाळू पिता आहे.’ विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नबंधनात अडकले. या दोघांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं नाव वामिका, तर मुलाचं नाव अकाय आहे.
आयपीएलमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. आतापर्यंत त्याने 10 सामन्यात 63.28 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.सध्या आरसीबीचे गुणतालिकेत 14 गुण असून एक विजयानंतर प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे.