RCB vs SRH IPL 2021 Match Prediction : विराटसेना सलग दुसरा विजय मिळवणार की हैदराबाद कमबॅक करणार?

आयपीएलमध्ये बुधवारी (आज 14 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत.

RCB vs SRH IPL 2021 Match Prediction : विराटसेना सलग दुसरा विजय मिळवणार की हैदराबाद कमबॅक करणार?
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 10:24 PM

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी (आज 14 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची आजवरची आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 10 सामने डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादने तर 7 सामने विराटच्या आरसीबीने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. या 18 सामन्यांमध्ये आयपीएल 2016 च्या अंतिम सामन्याचादेखील समावेश आहे. या सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर मात करत दुसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावला होता. (Who will win Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match in IPL 2021)

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरु आणि हैदबाराद हे दोन्ही संघ आतापर्यंत एकेक सामना खेळले आहेत. पहिल्या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर मात करत विजयी सलामी दिली आहे. तर वॉर्नरच्या हैदराबादला कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. हैदराबाद आणि बंगळुरुमधील मागील पाच सामन्यांचा विचार केला तर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) संघ आजच्या सामन्यात वरचढ ठरु शकतो. कारण मागील 5 पैकी 3 सामन्यांमध्ये हैदराबादने बंगळुरुवर मात केली आहे.

पडिक्कल परतल्याने बंगळुरु भक्कम

मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या अनुपस्थितीत कर्णधार विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर सलामीला आले होते, परंतु ही जोडी यशस्वी ठरु शकली नाही. परंतु देवदत्त पडिक्कल आता परतला आहे. त्यामुळे त्याच्या आगमनाने बंगळुरुची फलंदाजी आणखी भक्कम झाली आहे. आरसीबीच्या मुंबई इंडियन्सविरूद्धच्या विजयात एबी डिव्हिलियर्सची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने 27 चेंडूत 48 धावा फटकावल्या होत्या. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेललाही त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. पहिल्या सामन्यात त्याने सहज फटकेबाजी केली होती, दरम्यान, आजच्या सामन्यात हर्षल पटेलच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असेल. पहिल्या सामन्यात त्याने 27 धावा देऊन 5 बळी घेतले होते, अशाच कामगिरीची आज तो पुनरावृत्ती करतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विलियमसनविना हैदराबाद बॅकफुटवर

दुसरीकडे, सनरायझर्सचे दोन्ही सलामीवीर ऋद्धिमान साहा आणि डेव्हिड वॉर्नर केकेआरविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरले होते. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्या सामन्यात जरी अपयशी ठरला असला तरी तो या टी -20 लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज आहे. अशा परिस्थितीत बंगळुरुचा संघ त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. दरम्यान, आक्रमक फलंदाज केन विलियमसनचं आजच्या सामन्यातही खेळणं कठीण आहे. संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस म्हणाले की, तो पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) होण्यासाठी थोडा वेळ लागेल. मागील सामन्यात हैदराबादने सलामीच्या विकेट लवकर गमावल्या होत्या. परंतु जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडे यांनी चांगली भागीदारी करत संघाला संकटातून वाचवलं होतं. आजच्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

विराट विरुद्ध वॉर्नर

आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने फटकावल्या आहेत, तर हैदराबादसाठी सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकावल्या आहेत. वॉर्नरने बंगळुरुविरुद्ध 593 धावा फटकावल्या आहेत. तर विराटने हैदराबादविरुद्ध 531 धावा फटकावल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये लीग राऊंडमध्ये दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी त्यावेळी एकेक सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आले. हा सामना हैदराबादने जिंकला होता.

संबंधित बातम्या

IPL 2021 SRH vs RCB Head to Head Records : विराट की वॉर्नर, आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?

महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी, मुंबईतले IPL 2021 चे सामने रद्द करावे लागणार?

IPL 2021 | गेलचा झेल घेताना झाला ‘झोल’, बेन स्टोक्सवर आयपीएल 2021 सोडण्याची वेळ

(Who will win Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match in IPL 2021)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.