Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोनाचं संकट आणखी गडद, चेक रिपब्लिकचा खेळाडूही कोरोनाबाधित

टोक्यो ऑलम्पिकला 23 जुलैला सुरुवात होणार आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या महास्पर्धेतही कोरोनाचा व्यत्यय येत आहे.

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोनाचं संकट आणखी गडद, चेक रिपब्लिकचा खेळाडूही कोरोनाबाधित
टोक्यो ऑलम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव

टोक्यो :  टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) ही महास्पर्धा सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेच्या तयारीत जपान सरकारसह आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOA) सर्व प्रकारची काळजी घेऊनही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दर दिवशी एक नवी केस समोर येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार चेक रिपब्लिकची बीच वॉलीबॉल टीम (Czech Republic beach volleyball Team) मधील खेळाडू ओंद्रेज पेरूसिच (Ondrej Perusic ) याला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच त्याची कोविड-19 चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. चेक रिपब्लिकच्या ऑलम्पिक ताफ्यातील ही कोरोनाची दुसरी केल आहे. चेक रिपब्लिकच्या ऑलम्पिक संघाने त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली.

टोक्यो ऑलम्पिकची सुरुवात 23 जुलैपासून होणार आहे.  पण कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे जपानचे नागरिक या खेळांना सतत विरोध करत आहेत. पण आयोजक या खेळांच्या यशस्वी आयोजनाची आशा व्यक्त करुन तयारी करत आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी होणारे हे खेळ पुढे ढकलून यंदा घेण्यात येत आहेत. मात्र यंदाही कोरोनाच्या केसेस समोर येतच असल्याने सरकारसह आयोजकांची डोकेदुखी वाढली आहे.

खेळाडूत कोणतीही लक्षणं नाही

चेक रिपब्लिक ऑलम्पिकच्या अधिकृत ट्विटरवर लिहिलेल्या माहितीनुसार,‘‘सर्व प्रकारती काळजी घेतल्यानंतरही बीच वालीबॉल संघाचा खेळाडू ओंद्रेज पेरूसिच याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्यातरी त्याच्यामध्ये कोणतीच लक्षण नसली तरी नियामानुसाक त्याला विलगीकरणात ठेवले आहे.’’

दक्षिण आफ्रीका फुटबॉल संघातही कोरोना

रविवारी  दक्षिण आफ्रीका संघाचा फुटबॉलपटू ताबिसो मोनयाने आणि कामोहेलो माहलात्सी  आणि अँकर माशा यांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आले होते.  दक्षिण आफ्रीका फुटबॉल असोसिएशनने रविवारी याबाबतची माहिती दिली. टीमच्या मॅनेजरने सांगितले, “आमच्या संघातील तीन सदस्य कोरोनाबाधित आढळले आहेत. ज्यामध्ये दोन खेळाडूंसह एक अधिकारी आहे. सर्व संघाची दररोज स्क्रीनिंग होते. मात्र तरीही या तिघांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केल्यावर ही माहिती समोर आली.”

हे ही वाचा :

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा

Tokyo Olympic सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचा कहर, ब्राझील, रशियापाठोपाठ जपानच्या संघातही कोरोनाचा शिरकाव

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

(Czech republic Athletes in Tokyo olympics Found Corona Positive)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI