Gautam Gambhir : गौतम गंभीरमुळे टीम इंडिया संकटात, करतोय मोठी चुक; आक्षेपांमुळे खळबळ
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनीतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गौतम गंभीर संघाची बांधणी करताना काही चुका करतोय, असाही सुर आळवला जात आहे.

Gautam Gambhir : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिा यांच्यात पाच टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील पहिल्याच कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रेकेने भारतावर मात केली आहे. भारताने चुकीती रणनीती आखल्यामुळेच भारताचा पराभव झाला, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेल्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आर अश्वीन, हरभजन सिंग, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली, दिनेस कार्तीक अशा खेळाडूंनी गौतम गंभीर आणि भारतीय संघाच्या रणनीतीबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे गौतम गंभीरमुळे भारतीय संघ अडचणीत तर सापडणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. संघनिवडीत त्याची महत्त्वाची भूमिका असते. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर आता गंभीरच्या रणनीती चुकीची आहे, असा एक सुर आळवला जातोय. दिनेश कार्तिकने क्रिकबझ या क्रिकेटविषयक बातम्या देणाऱ्या संकेतस्थळाशी बातचित केली. यावेळी बोलताा भारताच्या वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे चुकीचे ठरू शकत, असे मत व्यक्त केले आहे.
भारतीय संघ नेमकी काय भूमिका करत आहे?
वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूला तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीसाठी पाठवले जात असेल तर त्याला सरावादरम्यान फलंदाजीकडेच लक्ष द्यावे लागेल. गोलंदाजीकडे त्याचे दुर्लक्ष होईल. कारण एक खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीकडे पूर्ण ताकदीने लक्ष देऊ शकत नाही. शारीरिक अडचणी निर्माण होतात, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे. सोबतच दिनेश कार्तिकने वॉशिंग्टन सुंदरबाबत भारतीय संघाला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. तर आर अश्विनने भारतीय संघाच्या सरावावर प्रश्न उपस्थित केला आहे. अमोल मजूमदार, मिथून मन्हास, सचिन तेंडुलकर यासारखे खेळाडू कोलकात्याच्या मैदानात खेळत असते तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामना चौथ्या दिवसापर्यंत नेला असता. भारतीय फलंदाज आता फिरकीपटूंचा सामना पहिल्याप्रमाणे करत नाहीयेत, असे मत अश्विनने व्यक्त केले. त्यामुळे आता गौतम गंभीर भविष्यात आपल्या रणनीतीमध्ये बदल करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
