Photo : अरे बापरे! रेस हरल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनने मारली विमानातून उडी

Formula One शर्यतीत अव्वल असणाऱ्या 'या' खेळाडूला काही दिवसांपूर्वी एका पराभवाचा सामना करावा लागला होता.

1/4
Formula One Lewis Hamilton
Formula One रेसमध्ये लुईस हैमिल्टन (Lewis Hamilton) हा सध्या वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याच्याकडे सर्वात जास्त वेळा रेस जिंकल्याचे किताब असून त्याने माइकल शूमाकर यांच्या रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे. दरम्यान लुईस काही दिवसांपूर्वी मोनाको ग्रँड प्रिक्स (Monaco Grand Prix) येथील ट्रॅक रेस हारला. त्याच पराभवाचे दुख मिटवण्यासाठी लुईसने थेट विमानातूनच उडी घेतली. (Formula One Champion Lewis Hamilton Did Skydive in Dubai)
2/4
Lewis Hamilton skydive
घाबरु नका लुईसने विमानातून उडी घेत स्वत:चे काही बरेवाईट करुन घेतले नाही. त्याने दुबई येथे जात स्कायडाइविंग (Skydive in Dubai) करताना विमानातून उडी घेतली स्वत:ला ताजेतवाने करण्यासाठी त्याने असे केल्याचे सांगितले जात आहे.
3/4
Lewis Hamiltons
दुबईतील वाळवंटी क्षेत्रात लुईसने स्कायडायविंगचा आनंद लुटला. यावेळी त्याने हवेत काही मूव्स करत स्वत:ला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला.
4/4
Lewis Hamilton formula
मोनाको येथे पराभव पत्करलेल्या लुईससमोर आता बाकू येथील ट्रॅकवरील अजरबेजान ग्रँड प्रिक्स (Azerbaijan Grand Prix) ही एक महत्त्वाची रेस असणार आहे. येत्या 6 जून रोजी ही रेस पार पडणार आहे.