VIDEO: हार्दिक पंड्याचा धोनीसमोरच 'हेलिकॉप्टर शॉट'

मुंबई : आयपीएलच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात प्रेक्षकांना एक दुर्मिळ योग पाहायला मिळाला. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने क्रिकेटविश्वाला हेलिकॉप्टर शॉटची ओळख करुन देणाऱ्या धोनीसमोरच हा शॉट लगावला. चांगल्या मातब्बर खेळाडूंनाही हा शॉट खेळणे जमत नाही. मात्र, पंड्याने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना अगदी अचूकपणे हेलिकॉप्टर शॉट खेळला. पंड्याच्या या अचूक खेळीने …

Helicopter Shot, VIDEO: हार्दिक पंड्याचा धोनीसमोरच ‘हेलिकॉप्टर शॉट’

मुंबई : आयपीएलच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात प्रेक्षकांना एक दुर्मिळ योग पाहायला मिळाला. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने क्रिकेटविश्वाला हेलिकॉप्टर शॉटची ओळख करुन देणाऱ्या धोनीसमोरच हा शॉट लगावला. चांगल्या मातब्बर खेळाडूंनाही हा शॉट खेळणे जमत नाही. मात्र, पंड्याने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना अगदी अचूकपणे हेलिकॉप्टर शॉट खेळला.

पंड्याच्या या अचूक खेळीने काहीकाळ धोनीलाही आश्चर्यचकित केले आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्ती होणार नाही एवढ्या उत्तम पद्धतीने पंड्या खेळला. पंड्याच्या या खेळीने धोनीवरही आपली छाप सोडण्यात यश मिळवल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पंड्याने आपल्या 8 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार लगावत नाबाद 25 धावा केल्या. यातील प्रेक्षकांचे मन जिंकणारा क्षण ठरला ड्वेन ब्राव्होला मारलेला फटका. पंड्याने अखेरच्या षटकातील ब्राव्होच्या यार्कर चेंडूवर धोनी स्टाईल मारलेला हेलिकॉप्टर शॉट एवढा अचूक होता की तो थेट मैदानाच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीत गेला. या षटकाराने प्रेक्षकांना चांगलेच हर्षोल्हासित केले.

सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खराब सुरुवात झाली. संघाची धावसंख्या अगदी 150 च्या पुढे जाणेही कठीण वाटत होते. अशावेळी हार्दिक पंड्या आणि केरॉन पोलार्डने संघाची मदार आपल्या खांद्यावर घेत स्थिर धावसंख्या उभी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जसमोर 5 विकेट गमावत 171 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नईला 20 षटकांमध्ये 8 विकटेच्या मोबदल्यात केवळ 133 धावापर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जचा 37 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. आपल्या शानदार फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवत धोनीसह 3 विकेट घेणारा हार्दिक पंड्या या सामन्याचा सामनावीर ठरला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *