स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राराला सासुरवाडीकडून मिळाला इतका हुंडा? आकडा ऐकून बसेल धक्का
स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 17 जानेवारीला आपली मैत्रीण हिमानी मोरसोबत विवाह केला. त्यानंतर रविवारी रात्री या दोघांनी आपल्या लग्नाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 17 जानेवारीला आपली मैत्रीण हिमानी मोरसोबत विवाह केला. त्यानंतर रविवारी रात्री या दोघांनी आपल्या लग्नाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. नीरज चोप्राने आपल्या लग्नाचे काही फोटो पोस्ट करत लग्नाबाबत आपल्या फॅन्सला आणि प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आता नीरज चोप्राच्या लग्नाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नीरज चोप्राने आपल्या लग्नात किती हुंडा घेतला? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आता त्याचं उत्तर समोर आलं आहे.
नीरज चोप्राने आपल्या लग्नात हुंडाच घेतला नाही, शगुन म्हणून त्याने फक्त एक रुपया घेतला आहे. नीरज चोप्राचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. नीरज चोप्रा याचं लग्न आम्ही पारंपरिक पद्धतीनं मोठ्या थाटात केलं. आम्हाला मोठा आनंद झाला असं सुरेंद्र चोप्रा यांनी म्हटलं आहे.
नीरज चोप्रा यानं कोणालाही कल्पना न देता गुपचुप लग्न का उरकलं याबाबत देखील त्याच्या काकानं मोठा खुलासा केला आहे. नीरजचं लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं झालं आहे. हरियाणातील प्रथा, पंरपारानुसार हे लग्न करण्यात आलं. दोन्ही कुटुंबांनी हे लग्न गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता.आम्ही हे लग्न एवढं एन्जॉय केलं की आम्ही ते शब्दात नाही सांगू शकत.या लग्नात कुटुंबातील पुरुषांनी कुर्ता आणि धोती असा पेहेराव केला होता. नीरजच्या लग्नात आम्ही हुंडा घेतला नाही. फक्त एक रुपया घेतला,असं सुरेंद्र चोप्रा यांनी म्हटलं आहे.
या लग्नाबाबत माहिती देताना नीरज चोप्राचे दुसरे काका भीम चोप्रा यांनी सांगितलं की या लग्नाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. गेल्या दोन वर्षांपासून नीरज आणि हिमानी हे दोघं एकमेकांना ओळखतात. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले. नीरज आणि हिमानीच्या लग्नाची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.नीरजचं लग्न होणार आहे हे फक्त आम्हाला आणि हिमानीच्या कुटुंबालाच माहिती होतं, नीरजची देखील तशीच इच्छा होती असं भीम चोप्रा यांनी म्हटलं आहे.