VIDEO : टीम इंडियाने कांगारुंची घमेंड उतरवली तो क्षण

Ind Vs Aus 4th Victory Moment video: रिषभ पंतनं विजयी चौकार खेचत भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

VIDEO : टीम इंडियाने कांगारुंची घमेंड उतरवली तो क्षण
रिषभ पंत
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 2:48 PM

ब्रिस्बेन : नवख्या टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला. भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. रिषभ पंत यानं 89 धावांची ऐतिहासिक खेळी केली. रिषभ पंतनं विजयी चौकार खेचत बॉर्डर गावस्कर मालिकेत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत केले. तुमच्याबद्दल अभिमान वाटतो, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.( Ind Vs Aus 4th Test victory moment of team India in fourth test match against Australia)

वर्षा गायकवाड यांचे ट्विट

शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत विजयाचे शिल्पकार

आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दुसऱ्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह 89 धावांची विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेटकिपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे. भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.

भारताच्या गोलंदांजांची अफलातून कामगिरी

कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदांजांना 20 विकेट घ्याव्या लागतात, असं म्हटलं जातं. टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 369 धावांवर रोखल. पहिल्या डावात शार्दूल ठाकूर, टी,नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांनी 3 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं 1 एक विकेट घेतली. पहिल्या डावात केवळ एक विकेट घेतलेल्या मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 5 विकेटस घेतल्या. मराठमोळ्या शार्दूल ठाकूरनं देखील ऑस्ट्रेलिाच्या 4 विकेट घेतल्या तर वॉशिग्टन सुंदरनं एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 294 धावांवर रोखण्यात गोलंदाजांची देखील महत्वाची भूमिका होती.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind 4th Test | संयमी गिलने पाया रचला, धडाकेबाज रिषभ पंतने कळस चढवला

Ind Vs Aus | BCCI ने पेटारा उघडला, टीम इंडियाला बोनस जाहीर, जय शहांची मोठी घोषणा

रितेश देशमुख म्हणाला, टीम इंडिया ‘लय भारी’, संभाजीराजे म्हणतात ‘अमेझिंग’

( Ind Vs Aus 4th Test victory moment of team India in fourth test match against Australia)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.