गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

विराट कोहलीचे चाहते त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या खाजगी जीवनातही तितकाच रस घेतात. विराट देखील सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या हटके प्रश्नांना उत्तर देत असतो.

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा...
विराट कोहली

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीचे जितके चाहते आहेत, तितकेच चाहते त्याच्या राहणीमानाचेही आहेत. विराट केवळ एक क्रिकेटर नसून अनेकांचा रोल मॉडेल आहे. विराट खाजगी जीवनात कसा राहतो?, काय खातो?, त्याच्या आवडी-निवडी काय? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. दरम्यान एका चाहत्याने विराटले अगदीच हटके प्रश्न विचारला. ‘गूगलवर काय सर्च करतोस?’ असा प्रश्न विचारताच विराटने देखील सर्वात लेटेस्ट सर्च केलेली गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. (Indian Cricket Team Captain Virat Kohli Google Search Cristiano Ronaldo Transfer News During Quarantine in Mumbai)

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना खेळण्यासाठी 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि संघातील सहकारी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान आपल्या फॅन्सशी ऑनलाईन गप्पागोष्टी करण्याचा विराटचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना हेच हवं होतं…. !

काय सर्च करतो विराट कोहली?

विराटला चाहत्याने गूगलला सर्वांत शेवटी काय सर्च केलं होतं? हे विचारताच विराटने ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो ट्रान्सफर’ असं उत्तर दिलं. त्यामुळे विराट प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) भविष्यात कोणत्या संघात खेळू शकतो? याबाबत सर्च करत असल्याचं समोर आलं.

कोण आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो?

‘ ख्रिस्तियानो रोनाल्डो’ हे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वात मोठ नाव म्हटलं, तर अतिशयोक्ती होणार नाही. पोर्तुगाल देशाचा कर्णधार आणि सध्या जुव्हेंटस क्लबकडून खेळणारा रोनाल्डो जगातील अनेकांचा आवडता फुटबॉलपटू आहे. जगभरात रोनाल्डोचे करोडो चाहते आहेत. कोहलीप्रमाणे रोनाल्डोबद्दलचीही माहिती जाणून घेण्यासाठी रोनाल्डोचे चाहते उत्सुक असतात. विराट आणि रोनाल्डो हे दोघे देखील एकमेंकाना चांगले ओळखत असून अमेरिकन टूरिस्टर या
बॅगेज कंपनीचे दोघेही ब्रँड अॅम्बेसिडर राहिले आहेत.

फॅन्सने विचारलं वामिका चेहरा कधी दाखवणार?

एका फॅन्सने विराटला खास प्रश्न विचारला ज्या उत्तराची सगळी जग वाट पाहत होतं. तुझ्या लेकीच्या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? तिची एक झलक आम्हाला दाखवू शकशील का? असे एकापाठोपाठ एक तीन प्रश्न एका फॅन्सने विराटला विचारले. विराटने चाहत्याला प्रश्नाला अगदी दिलखुलास उत्तरं दिली. वामिका हे देवी दुर्गाचं दुसरं नाव आहे. आम्ही नवरा बायकोने ठरवलंय (विराट-अनुष्का) की आपल्या लेकीचा फोटो आपण सोशल मीडियावर टाकायचा नाही. जोपर्यंत तिला सोशल मीडिया म्हणजे काय? हे समजत नाही तोपर्यंत तिचा चेहरा, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. यासंदर्भात ती (वामिका) तिचा निर्णय घेईन, अशी विराट स्टाईल उत्तरं चाहत्याला मिळाली.

हे ही वाचा :

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल