Photo : UPSC परीक्षेत धडाकेबाज कामगिरी, IAS क्रिकेटपटूचा सलामीच्या सामन्यात धमाका!

भारतातील सर्वांत अवघड परिक्षांमधील एक परिक्षा म्हणजे UPSC. भारतीय सरकारी सेवेत सामिल होण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परिक्षा देतात.

1/5
Amay-Khurasiya-Career
क्रिकेट खेळता खेळता UPSC सारखी भारतातील सर्वांत अवघड परिक्षा देऊन IAS झालेला एक क्रिकेटपटू ही भारतीय संघातून खेळला होता. अमय खुरासिया अस त्यांच नाव असून 90 च्या अखेरीस खुरासिया यांनी भारतीय संघात पदार्पण केले होते. (Indian Cricketer Amay Khurasiya Cleared IAS Exams Before ODI Debut)
2/5
Amay-Khurasiya-Record
भारताचे हे माजी फलंदाज अमय खुरासिया यांचा जन्म 18 मे 1972 रोजी मध्यप्रदेशच्या जबलपुर जिल्ह्यात झाला होता. तिथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर अवघ्या 17 वर्षाच्या वयातच खुरासिया यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी अभ्यासावर देखील लक्ष ठेवून UPSC चा अभ्यासही सुरुच ठेवला.
3/5
Khurasiya-IAS
IAS ची परिक्षा पास होताच, खुरासिया यांची कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइस डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती झाली. सोबतच त्यांचे क्रिकेट खेळणे ही सुरुच होते.मध्यप्रदेश संघाकडून 19 वर्षीय वयात प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही डावांत 99 धावा करणारे ते पहिले फलंदाज ठरले.
4/5
Amay-Khurasiya
उत्तम प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून देखील खुरासिया यांना भारतीय संघात पदार्पणासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. अखेर 1999 मध्ये श्रीलंका संघाविरोधात त्यांनी संघात पदार्पण केले. सलामीच्या एकदिवसीय सामन्यातच खुरासिया यांनी 45 चेंडूत 57 धावांची धमाकेदार खेळी केली.
5/5
Amay-Khurasiya-Intro
सलामीच्या सामन्यानंतर खुरासिया इतकी खास कामगिरी करु न शकल्याने 2001 मध्ये श्रीलंकेविरोधात शेवट सामना खेळले. संपूर्ण कारकिर्दीत खुरासिया यांनी 12 एकदिवसीय सामन्यांत 149 धावा केल्या ज्यात एका अर्धशतकाचा समावेश होता. मध्यप्रदेशकडून मात्र त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये119 सामन्यांत 7 हजार 304 धावा केल्या. ज्यात 21 शतकांचा समावेश होता.