भारतीय पुरुष हॉकी संघाकडून ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये बेल्जियमचा 5-4 असा पराभव

मनप्रीत सिंगने भारताला पेनल्टी कॉर्नर दिला, ज्याचे हरमनप्रीत सिंगने गोल केले. तर दुसरीकडे, जर्मनप्रीतने तिसरा गोल केला जेव्हा भारताने पेनल्टी कॉर्नरवर वापरून बेल्जियमला ​​चकवले होते, आणि शूटआऊट 4-4 अशी बरोबरीत असतानाच आकाशदीपने गोल करत स्कोअर 5-4 केला आणि FIH हॉकी प्रो लीग सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये बेल्जियमचा पराभव केला.

भारतीय पुरुष हॉकी संघाकडून ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये बेल्जियमचा 5-4 असा पराभव
भारतीय हॉकी संघाकडून ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमचा 5-4 असा पराभवImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:15 AM

अँटवर्प/बेल्जियम: भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने (Goalkeeper PR Sreejeshne) रोमांचकारी शूटआऊटमध्ये व लक्ष्यभेदी आक्रमण करत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून FIH हॉकी प्रो लीग सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये बेल्जियमचा (Belgium in Olympic champion) 5-4 असा पराभव केला. शनिवारी अँटवर्पमध्ये हा सामना झाला. निकोलस डी केरपेलने शूटआऊट दरम्यान श्रीजेशने केलेल्या प्रयत्नामुळे व वाचवलेल्या पेनल्टी स्ट्रोकमुळे (Penalty stroke) भारताचा विजय निश्चित झाला.

गोलरक्षक पीआर श्रीजेशने या सामान्यात निर्धारित वेळेत अनेक गोल रोखून धरले, त्याबरोबरच पेनल्टी स्ट्रोकला रोमहर्षक पेनल्टी शूटआऊटमध्ये वाचवले.

आठ मिनिटांचा खेळ बाकी असताना

त्यामुळेच भारतीय पुरुष हॉकी संघाकडून FIH प्रो लीगच्या सुरुवातीच्या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमचा 5-4 असा पराभव करण्यात आला. या सामन्यात आठ मिनिटांचा खेळ बाकी असताना भारतीय संघ 1-3 असा पिछाडीवर होता पण स्कोअर 3-3 असा बरोबरीत ठेवला आणि सामना शूटआउटमध्ये खेचून आणण्यात आला.

मोक्याच्या क्षणी रोखून धरला

तिसरा पेनल्टी घेणाऱ्या अलेक्झांडर हेंड्रिक्सचा फटका श्रीजेशने मोक्याच्या क्षणी रोखून धरला. शूटआऊट 4-4 अशी बरोबरीत असतानाच आकाशदीपने गोल करत स्कोअर 5-4 असा केला.

 दोन गोल खूप महत्त्वापूर्ण

या सामान्यात श्रीजेशने अनेक गोल रोखून धरले, पण शेवटच्या क्वार्टरमध्ये वाचवलेले दोन गोल खूप महत्त्वापूर्ण ठरले आहेत. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही ज्यामध्ये श्रीजेशने दोन शॉट्स वाचवले होते. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारतासाठी 18 व्या मिनिटाला समशेर सिंगने गोल केला. त्यावेळी तीन मिनिटांनंतर सेड्रिक चार्लियरच्या गोलमुळे बेल्जियमने सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 36 व्या मिनिटाला सायमन गोनार्डने बेल्जियमला ​​आघाडी मिळवून दिली. ज्यावेळी त्यांना सामन्यात आघाडी मिळाली त्यावेळी मात्र बेल्जियम संघाला विजयाचा विश्वास मिळाला होता. यादरम्यान श्रीजेशने आणखी दोन शॉट्स वाचवले पण डी केरपेलेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून 3-1 अशी आघाडी घेतली.

… आणि बेल्जियमचा पराभव झाला

यावेळी मनप्रीत सिंगने भारताला पेनल्टी कॉर्नर दिला, ज्याचे हरमनप्रीत सिंगने गोल केले. तर दुसरीकडे, जर्मनप्रीतने तिसरा गोल केला जेव्हा भारताने पेनल्टी कॉर्नरवर वापरून बेल्जियमला ​​चकवले होते, आणि शूटआऊट 4-4 अशी बरोबरीत असतानाच आकाशदीपने गोल करत स्कोअर 5-4 केला आणि FIH हॉकी प्रो लीग सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये बेल्जियमचा पराभव केला.

एक चांगल्या टीमचा चांगला प्रयत्न

सामन्यानंत श्रीजेशने सांगितले की, आमच्या टीमकडून झालेला हा एक चांगल्या टीमचा प्रयत्न होता. त्यामुळेच आम्ही या सामान्यात अखेरपर्यंत लढत राहिलो. समोरचा संघ हा जागतिक चॅम्पियन आहे, आणि तो ऑलिम्पिक चॅम्पियनही राहिला आहे. या सामान्यात आम्ही एकही सेकंद वाया घालवला नाही, त्यामुळेच आम्ही या सामान्यात टिकून राहू शकलो आणि टिकून खेळू शकलो.उद्या देखील, आम्ही बेल्जियमसारख्या संघाविरुद्ध एकही चूक करू शकणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.