IPL 2020, KKR vs MI | मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पोलार्डला या विशेष कामगिरीसाठी सामना सुरु होण्याआधी गौरवण्यात आले.| (Mumbai Indians Kieron Pollard Record)

IPL 2020, KKR vs MI | मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 10:29 PM

अबुधाबी : आयपीएलच्या (IPL 2020 ) 13 व्या मोसमातील 5 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्यास भाग पाडले आहे. यासोबतच मुंबईचा स्फोटक खेळाडू किरॉन पोलार्डने ( Kieron Pollard ) एक मोठा रेकॉर्ड केला आहे. मुंबईच्या दिग्गज खेळाडूंना न जमलेली कामगिरी पोलार्डने करुन दाखवली आहे. (Mumbai Indians Kieron Pollard Record )

कोलकाता विरोधातील हा सामना पोलार्डच्या आयपीएल कारकिर्दीतील 150 वा सामना ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने हे 150 सामने मुंबईकडूनच खेळले आहेत. मुंबईकडून 150 सामने खेळणारा पोलार्ड हा एकमेव खेळाडू ठरला आहे. याबाबतची माहिती मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवहॅंडल वरुन दिली आहे.पोलार्डला या विशेष कामगिरीसाठी सामना सुरु होण्याआधी गौरवण्यात आले. पोलार्डला त्याच्या 150व्या सामन्यानिमित्ताने जर्सी देण्यात आली.

पोलार्ड हा त्याच्या आक्रमक आणि स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. पोलार्डने आतापर्यंत अनेकदा मुंबईला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. पोलार्ड बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा सर्वच बाबतीत यशस्वी ठरला आहे.

पोलार्डची आयपीएलमधील कामगिरी

पोलार्डने 2010 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2020 पर्यंत 150 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 2 हजार 786 धावा केल्या आहेत. यात 177 गगनचुंबी सिक्स आणि 183 चौकारांचा समावेश आहे. तसेच पोलार्डने 14 अर्धशतक लगावले आहेत. आयपीएलमध्ये पोलार्डची 83 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने 57 विकेटही घेतले आहेत.

पोलार्डनंतर मुंबईसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा, हरभजन सिंह आणि लसिथ मलिंगा यांचा नंबर लागतो. या तिघांनी अनुक्रमे मुंबईसाठी 145, 136 आणि 122 सामने खेळले आहेत. (Mumbai Indians Kieron Pollard Record )

संबंधित बातम्या : 

IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली

IPL 2020 : यूएईचा कर्णधार कोहलीच्या मदतीला, RCB ची भन्नाट आयडिया

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.