#GTvsRR: क्वालिफायर मॅचमध्ये राजस्थानची पलटण गुजरातबरोबर भिडणारच पण त्या आधीच मिम्स शेअर करुन लोकांनी मॅचमध्ये आणखी रंगत आणले

#GTvsRR: क्वालिफायर मॅचमध्ये राजस्थानची पलटण गुजरातबरोबर भिडणारच पण त्या आधीच मिम्स शेअर करुन लोकांनी मॅचमध्ये आणखी रंगत आणले

आजचा सामना कोणता संघ जिंकणार आणि कोण पराभूत होणार याबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. त्यातील काही निवडक हे मीम्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

महादेव कांबळे

|

May 24, 2022 | 7:49 PM

मुंबईः आयपीएल (IPL 2022) चा हा मोसम आतापर्यंत खूपच रोमांचकारी ठरला आहे. यावेळी मोठे आणि बलाढ्य संघाना मोठी हार पत्कारावी लागली असल्याने अनेक क्रिडाप्रेमींना धक्का बसला आहे. तर या आयपीएलच्या मोसमामध्ये नवे संघही आपल्या संघांची चांगली कामगिरी करताना दिसले. आता हंगामातील प्लेऑफ सामनेही (Playof Match) सुरू झाले आहेत. पहिला क्वालिफायर सामना आज 24 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जातो आहे. हा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royls) यांच्यामध्ये होणार आहे. यामध्ये गुजरात हा नवा संघ आहे, आणि तो नवा असला तरी त्याने पहिल्याच सत्रात चमकदार कामगिरी करून पात्रता फेरी गाठली आहे. या संघाची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे, तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचा सामना जोही संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहोचणा आहे.

तर या सामान्यातून पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला दुसरा क्वॉलिफायर सामना खेळावा लागणार आहे. ज्यामध्ये जिंकल्यानंतरच त्याला सामन्यात दाखल करण्याचे तिकीट मिळणार आहे. आता कोणता संघ अंतिम फेरीत जाणार याबाबत सोशल मीडियावर रंगतदार चर्चा सुरू झाल्या आहेत. आजचा सामना कोणता संघ जिंकणार आणि कोण पराभूत होणार याबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. त्यातील काही निवडक हे मीम्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें