LSG vs KKR IPL 2022: डि कॉक-राहुलने KKR च्या बॉलर्सची पिसं काढली, बिनबाद 210 धावा ठोकल्या, पहा VIDEO

LSG vs KKR IPL 2022: आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी तुफान बॅटिंग केली. LSG ने नो लॉस 210 धावांचा डोंगर उभा केला. केकेआरच्या गोलंदाजांची लाज काढली.

LSG vs KKR IPL 2022: डि कॉक-राहुलने KKR च्या बॉलर्सची पिसं काढली, बिनबाद 210 धावा ठोकल्या, पहा VIDEO
LSG Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:09 PM

मुंबई: कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (KKR vs LSG) नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना सुरु आहे. आयपीएलमधला हा 66 वा सामना आहे. आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी तुफान बॅटिंग केली. LSG ने नो लॉस 210 धावांचा डोंगर उभा केला. केकेआरच्या गोलंदाजांची लाज काढली. क्विंटन डि कॉक (Quinton de Kock) आणि लोकेश राहुलने (Lokesh Rahul) द्विशतकी भागीदारी केली. क्विंटन डि कॉकने 70 चेंडूत 140 धावा चोपल्या. यात 10 चौकार आणि 10 षटकार होते. कॅप्टन केएल राहुलने चांगली साथ दिली. त्याने 51 चेंडूत 68 धावा फटकावल्या. यात तीन चौकार आणि चार षटकार होते. क्विंटन डि कॉकने आयपीएल 2022 च्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. आयपीएल करीयरमधलं त्याचं हे दुसर शतक आहे. त्याने केएल राहुलसोबत रेकॉर्ड भागीदारी केली.

सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड

डि कॉकने फक्त 59 चेंडूत शतक झळकावलं. याआधी दिल्लीकडून खेळताना 2016 साली त्याने सेंच्युरी ठोकली होती. शतक झळकावल्यानंतर टिम साउदीच्या 19 व्या षटकात त्याने तीन षटकार ठोकले. आंद्रे रसेलच्या 20 षटकात चार सिक्स मारल्या. लखनौसाठी शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज बनला आहे. याआधी केएल राहुलने या सीजनमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. आयपीएलच्या इतिहासात सलामीला येऊन सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड त्यांनी रचला.

क्विंटन डि कॉकने मारलेले 10 फोर, 10 सिक्स इथे क्लिक करुन पहा

राहुलच्या सलग पाचव्या सीजनमध्ये 500 धावा

केएल राहुल आयपीएलमध्ये नेहमीच दमदार खेळ दाखवतो. आजही त्याने तसंच प्रदर्शन केलं. त्याने 500 धावा पूर्ण केल्या आहेत. सलग पाचव्या सीजनमध्ये राहुलने अशी कामगिरी केली आहे. लखनौने 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी दोन्ही संघांना आज विजय आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.