एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

सलग नऊ वर्ष विजय मिळवणाऱ्या जुव्हेंटस संघाला यंदा सिरीज 'ए' स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. त्याचे खापर प्रशिक्षक आंद्रे पिर्लोवर फोडण्यात आले असून त्याला प्रशिक्षक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!
आंद्रे पिर्लो

रोम : इटलीचा महान फुटबॉलपटू फ्रि किक स्टार आंद्रे पिर्लो हा प्रशिक्षक म्हणून नापास झाला आहे. जुव्हेंटस या इटलीच्या सिरीज ‘ए’ लीगमधील सर्वात यशस्वी संघाचा प्रशिक्षक म्हणून पिर्लो याला नेमण्यात आलं होते. मात्र सलग नऊ वेळा सिरीज ‘ए’ चॅम्पियन असणाऱ्या जुव्हेंटसला यंदा ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा (Cristiano Ronaldo) महान खेळाडू संघात असताना देखील पराभव पत्करावा लागला. रोनाल्डोने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल करुन देखील संघाला पराभव स्वीकारावा लागल्याने संपूर्ण पराभवाचे खापर पिर्लो याच्यावर फोडण्यात आले. त्याला प्रशिक्षक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. (Juventus fc dismises Manager Andrea Pirlo after Defeat in Series A in Champions League)

आपल्या कारकिर्दीत आंद्रे पिर्लो याने इटलीच्या राष्ट्रीय संघासह त्याच्या क्लब्सना अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले होते. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीकडे पाहूनच 2020 मध्ये त्याला जुव्हेंटस संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र संघाला चॅम्पियन्स लीगच्या राऊंड 16 मध्येच पोर्टोसारख्या संघाकडूनही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघाच्या सुमार कामगिरीमुळे 28 मे रोजी केवळ एका सीजननंतरच पिर्लोला प्रशिक्षक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Andrea Pirlo Juventus

Andrea Pirlo Juventus

नवा प्रशिक्षक कोण?

सिरीज ‘ए’ मध्ये जरी जुव्हेंटस पराभूत झाली असली, तरी पिर्लो यांच्याच प्रशिक्षणाखाली जुव्हेंटसने इटालियन सुपरकप आणि इटालियन कप या दोन स्पर्धांत विजय मिळवला होता. पिर्लोच्या जागी याआधी जुव्हेंटसचे प्रशिक्षत असणारे
मासिमिलियानो पुन्हा प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंटर मिलान विजयी

2011 पासून विजय होत असलेल्या जुव्हेंटस संघाची विजयाची साखळी यंदा तुटली. जुव्हेंटसला 78 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर इंटर मिलान संघाने 94 गुणांसह विजय मिळवत 2020-21 च्या चषकावर आपले नाव कोरले.

संबंधित बातम्या 

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल

Photo : मँचेस्टर सिटी संघाचा हुकूमी एक्का, मॅराडोनाचा जावई, ढिगभर गर्लफ्रेंड

(Juventus fc dismises Manager Andrea Pirlo after Defeat in Series A in Champions League)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI