मलिंगाचा भीमपराक्रम, 24 तासात 10 विकेट्स, दोन देशांची मैदाने गाजवली!

मुंबई: आयपीएलमधील (IPL 2019) मुंबई इंडियन्स संघातील श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga ) अनोखा विक्रम केला आहे. मलिंगाने 24 तासांच्या आत दोन देशांत दोन  संघांकडून खेळताना 10 विकेट्स घेतल्या. दोन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना मलिंगाने हा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये मलिंगाने बुधवारी मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो श्रीलंकेला रवाना …

मलिंगाचा भीमपराक्रम, 24 तासात 10 विकेट्स, दोन देशांची मैदाने गाजवली!

मुंबई: आयपीएलमधील (IPL 2019) मुंबई इंडियन्स संघातील श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga ) अनोखा विक्रम केला आहे. मलिंगाने 24 तासांच्या आत दोन देशांत दोन  संघांकडून खेळताना 10 विकेट्स घेतल्या. दोन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना मलिंगाने हा पराक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये मलिंगाने बुधवारी मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो श्रीलंकेला रवाना झाला. श्रीलंकेत गॅले विरुद्ध कॅण्डी या संघामध्ये 50 षटकांचा सामना झाला. मलिंगा गॅले या संघाचं कर्णधारपद भूषवत होता. या सामन्यात त्याने तब्बल 7 विकेट्स पटकावत, अवघ्या 24 तासात दोन विविध देशात खेळताना 10 विकेट्स नावे केल्या.

मलिंगा मुंबईत आयपीएलचा टी 20 सामना खेळला, तर श्रीलंकेत 50 षटकांचा वन डे सामना खेळला.

आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धचा सामना मुंबईने 37 धावांनी जिंकला. मुंबईचा हा आयपीएलमधील 100 वा विजय ठरला. याच सामन्यात मलिंगाने चेन्नईचे शेन वॉटसन, केदार जाधव आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मलिंगा श्रीलंकेला रवाना झाला. तिथे सुपर फोर टूर्नामेंटमध्ये मलिंगाने कॅण्डीचं मैदान गाजवलं. मलिंगाने गॅलेकडून फलंदाजी करताना केवळ 2 धावा केल्या. मात्र कॅण्डी क्रिकेट संघाच्या 7 फलंदाजांना तंबूत धाडत, मलिंगाने आपली चुणूक दाखवली.

मलिंगाच्या भेदक गोलंदाजीमुळे गॅले संघाने कॅण्डी संघाचा तब्बल 156 धावांनी पराभव केला.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मलिंगाला एप्रिल महिन्यासाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र तो देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेटसाठीही श्रीलंकेत पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *